बलात्कार लपवण्यासाठी तरुणीच्या प्राइव्हेट पार्टमध्ये गोळी झाडून हत्या, काँग्रेस नेत्याने शेअर केली संतापजनक घटना

बलात्कार लपवण्यासाठी तरुणीच्या प्राइव्हेट पार्टमध्ये गोळी झाडून हत्या, काँग्रेस नेत्याने शेअर केली संतापजनक घटना

माणुसकीची हत्या करणारी ही घटना हरियाणामध्ये घडली आहे. आरोपींनी बलात्काराचे प्रकरण समोर येऊ नये म्हणून हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे.

  • Share this:

नवा दिल्ली, 14 डिसेंबर : काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या धक्कादायक घटनेची माहिती शेअर केली आहे. हरियाणामधील एका बलात्कार प्रकरणाबद्दल हे ट्वीट केलं आहे. या घटनेमध्ये नराधमांनी एका 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार केला आणि तिच्यावर तीन गोळ्या झाडून हत्या केली. भयंकर म्हणजे, या नराधमांनी मृत पीडितेच्या प्राइव्हेट पार्टमध्ये गोळी झाडून तिची हत्या केली.

माणुसकीची हत्या करणारी ही घटना हरियाणामध्ये घडली आहे. आरोपींनी बलात्काराचे प्रकरण समोर येऊ नये म्हणून हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. सुरजेवाला यांनी या बातमीची लिंक शेअर करत म्हटलं आहे की, निर्भया, कठुआ, उन्नवा आणि हैदराबाद प्रकरणापेक्षा ही घटना मन सुन्न करणारी आहे. ही बातमी वाचून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. माणुसकीच्या कौर्याची सीमा गाठणारी या घटनेबद्दल कुणी ऐकणार का?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीही दिल्लीतील रोहिणी येथील आपल्या एका नातेवाईकाकडे राहात होती. उपचारासाठी ती आपल्या वडिलांसह थांबली होती. ही तरुणी नैराश्यग्रस्त होती, तिच्यावर बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरू होते. पीडित तरुणीही एकुलती एक होती. मागील शनिवारी ही तरुणी घरापासून काही अंतरावरून अचानक गायब झाली. वडील आणि नातेवाईकांनी तिचा शोध घेतला पण कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसांमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

काही दिवसानंतर या तरुणीचा रक्ताने माखलेला मृतदेह हा धारूहेडाच्या नंदरामपूर बास रोडजवळ रामनगर इथं सापडला. त्यानंतर तिच्या वडिलांनी रेवाडी इथं जाऊन हा मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याची ओळख पटवली.

पोलिसांना संशय आहे की, या तरुणीचं अपहरण करून अत्याचार करण्यात आले आणि नंतर हत्या करण्यात आली. या तरुणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. परंतु, पोस्टमार्टम दरम्यान या तरुणीच्या शरीरातून तीन गोळ्या काढण्यात आल्याची बाब समोर आली. पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर अत्याचाराची बाब स्पष्ट होईल.

Published by: sachin Salve
First published: December 14, 2019, 8:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading