Home /News /national /

पिंजऱ्यात पडलेल्या तरुणावर वाघिणीचा हल्ला, नरडीचा घोट घेतल्यानं जागीच मृत्यू

पिंजऱ्यात पडलेल्या तरुणावर वाघिणीचा हल्ला, नरडीचा घोट घेतल्यानं जागीच मृत्यू

उद्यानात गेलेला तरुण वाघिणीच्या पिंजऱ्यात पडला. तेव्हा वाघिणीने हल्ला केल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

    रांची, 04 मार्च : झारखंडमध्ये ओरमांझी इथं असलेल्या बिरसा जैविक उद्यानात बुधवारी एका वाघिणीने 30 वर्षीय तरुणाला ठार केल्याची घटना घडली आहे. तरुण उद्यानात गेला तेव्हा तो वाघिणीच्या पिंजऱ्यात पडला. त्यावेळी तरुणाची सुटका होण्याआधीच वाघिणीने त्याच्यावर हल्ला चढवला. यामध्ये वाघिणीने नरडीचा घोट घेतल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, तरुण वाघिणीच्या पिंजऱ्यात पडला नसून त्यानं उडी मारल्याचीही चर्चा आहे. कारण एक भिंत आणि जाळी पार केल्यानंतरच पिंजऱ्यात जाता येतं. तरुण उद्यानात एकटाच आला होता. याप्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. तरुणाचा मृतदेह पिंजऱ्यातून बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी उद्यान बंद केलं आहे. उद्यानाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती देताना सांगितंल की, वाघिणीने तरुणावर हल्ला केला. हल्ला करणाऱ्या वाघिणीचे नाव अनुष्का आहे. युवक पिंजऱ्यात पडताच त्याच्यावर वाघिणीनं हल्ला केला. त्याच्या गळ्याजवळ वाघिणीने पकडलं. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणाची ओळख पटलेली नाही. याआधी बिरसा जैविक उद्यानात 2018 मध्ये रामू नावाच्या हत्तीने माहुताला आपटून ठार मारलं होतं. माहुताने हत्तीची तब्बल 12 वर्षे काळजी घेतली होती. हत्तीने माहुताला सोंडेत पकडून जमिनीवर आपटलं होतं. हे वाचा : हुंड्यात बुलेट न दिल्यानं चार मित्रांकडून पत्नीवर गँगरेप, पतीनेच शूट केला VIDEO
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या