'माझा श्वास गुदमरतोय', रुग्णालयात मध्यरात्री लालू प्रसाद यादव किंचाळले

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यादिवशी लालू प्रसाद यादव यांनी जेवणही केलं नव्हतं.

News18 Lokmat | Updated On: May 27, 2019 02:25 PM IST

'माझा श्वास गुदमरतोय', रुग्णालयात मध्यरात्री लालू प्रसाद यादव किंचाळले

रांची, 27 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना बराच त्रास झाल्याचं समजतं. ज्या दिवशी निकाल लागला त्यादिवशी त्यांनी जेवणही खाल्लं नव्हतं आता पुन्हा एकदा त्यांना त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. लालू प्रसाद यादव यांच्यावर रांचीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रुग्णालयात रविवारी रात्री अचानक लालू प्रसाद यादव ओरडायला लागले. त्यावेळी त्यांच्या सेवेसाठी असलेल्यांनी याची माहिती डॉक्टर आणि नर्सला दिली. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ते नॉर्मल असल्याचं दिसून आलं. मात्र, त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढलं आहे.

रविवारी सकाळी वीज गेल्यानं लालू प्रसाद यादव अस्वस्थ झाले आणि दचकून उठले. त्यावेळी सोबत असणाऱ्या व्यक्तीला सांगितलं की, श्वास गुदमरल्यासारखं वाटत आहे डॉक्टरांना बोलावून आण. त्यानंतर डॉक्टर आले आणि त्यांची तपासणी केली. सुमारे तासभर वीज गेली होती आणि लालू प्रसाद यादव यांची खोली पूर्ण बंद होती. यात हवा कमी असल्याने त्यांना गुदमरल्यासारखं वाटलं. अर्धा तास त्यांना खोलीबाहेर फिरवलं तेव्हा लालूंना स्वस्थ वाटू लागलं असं डॉक्टरांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत झारखंडमध्ये आरजेडीला एकही जागा मिळाली नाही. पक्षाने दोन जागा लढवल्या होत्या. लालू प्रसाद यादव चारा घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत आहेत.


Loading...

SPECIAL REPORT: काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 27, 2019 01:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...