• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • लालूंना कशाची वाटतेय भीती ? चालणं-फिरणंही केलं बंद

लालूंना कशाची वाटतेय भीती ? चालणं-फिरणंही केलं बंद

राष्ट्रीय जनता दलाचे नेेते लालूप्रसाद यादव हे चाराघोटाळा प्रकरणी शिक्षा भोगत आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्या हालचालींवर निवडणूक आयोगाची बारीक नजर आहे.

 • Share this:
  रांची, १८ मार्च : रांचीमधल्या एका हॉस्पिटलमध्ये भरती झालेले लालूप्रसाद यादव यांना स्वाईन फ्लू होण्याची भीती वाटते आहे. त्यामुळे त्यांनी बाहेर येऊन चालणंफिरणंही बंद केलं आहे. रिम्स हॉस्पिटलमधल्या ज्या वॉर्डमध्ये लालूप्रसाद यादव यांना भरती करण्यात आलंय त्याच वॉर्डमध्ये त्यांचे आरोग्य मंत्री रामचंद्र चंद्रवंशी हेही उपचार घेतायत. त्यांना स्वाइन फ्लू झाल्यामुळे लालूंनाही हा आजार होण्याची भीती वाटतेय. लालूप्रसाद यादव यांची तब्येत जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत त्यांना पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यांच्या तैनातीत असलेले सुरक्षा कर्मचारी आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनाही स्वाइन फ्लूची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे सगळेच जण मास्क लावून काम करतायत. दरम्यान, रांचीमधल्या याच वॉर्डवर शनिवारी बिहारचे तुरुंगाधिकारी आणि पोलिसांनी छापा घातला. लालूप्रसाद यादव यांना चाराघोटाळ्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्यामुळेच तुरुंगाधिकारी वीरेद्र भूषण यांच्या आदेशावरून हा छापा घालण्यात आला. पण या छाप्यामध्ये पोलिसांच्या फार काही हाती लागलं नाही. लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत लालू प्रसाद यादव यांच्यावर प्रशासकीय यंत्रणेची बारीक नजर आहे. लालूंना भेटायला या वॉर्डमध्ये काही जण आले होते. त्यावरूनही गदारोळ झाला. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या सोशल मीडियावरच्या सक्रिय राजकारणाबद्दल आक्षेप घेत निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी केली होती. लालूप्रसाद यादव हे शिक्षा भोगत असताना त्यांना स्मार्टफोन, लॅपटॉप यासारख्या सुविधा कशा दिल्या जातात, असा सवालही त्यांनी विचारला आहे. ======================================================================================================================================================================
  First published: