लोकसभेच्या निकालामुळे लालू प्रसाद निराश; दुपारचे जेवण सोडले!

लोकसभेच्या निकालामुळे लालू प्रसाद निराश; दुपारचे जेवण सोडले!

लोकसभा निवडणुकीच्या निकाला दिवशी सकाळी 8 पासून लालू टिव्ही पाहत होते. पण...

  • Share this:

रांची, 26 मे: झारखंडची राजधानी रांचीमधील रिम्स रुग्णालयात उपचार घेणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसात यादव यांची दिनक्रम बिघडला आहे. गेल्या ३ दिवसांपासून लालू झोपल नाहीत आणि दुपारचे जेवले नाहीत. झोप आणि जेवण न केल्यामुळे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे टेन्शन वाढले आहे.

लालूंवर उपचार करणारे डॉक्टर उमेश प्रसाद सकाळचा नाष्टा करतात. पण दुपारचे जेवण करत नाहीत. दुपारच्या जेवणानंतर ते थेट रात्री जेवतात. त्यामुळे त्यांना इन्सुलिन देताना अडचणी येत आहेत. टेन्शन घेतल्यामुळे त्यांची असं होत असल्याचे त्यांनी सांगितले.

नीट झोप आणि जेवण करण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना अनेक वेळा विनंती केली पण लालूंनी त्यास नकार दिला. लालूंच्या प्रकृतीसाठी वेळेवर जेवण आणि औषध घेण गरजेचे आहे. जर ते वेळेवर जेवले नाही तर औषध देण्यास अडचण होते आणि त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होईल. शनिवारी त्यांचा रक्तबाद आणि साखर ठिक होती. पण त्यांचा दिनक्रम सुधारला नाही तर काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी लालू प्रसाद सकाळी 8 वाजल्यापासून टीव्ही पाहत होते. जस जसे निकाल येऊ लागले ते निराश झाले. दुपारी 1च्या सुमारास त्यांनी टिव्ही बंद केला आणि झोपी गेले. लालू यांच्या पक्षाला यंदा एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.

लालूंचे चरित्र 'गोपालगंज टू रायसीना'

लाला प्रसाद यादव यांच्या 50 वर्षाच्या राजकीय प्रवासावर नलिन वर्मा पुस्तक लिहित आहेत. राजदच्या नेत्यांसह वर्मा यांनी देखील लालू यांची शनिवारी भेट घेतली होती. आम्ही सर्व जण त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत असल्याचे ते म्हणाले.

VIDEO: भरधाव कारचा थरार! चालकाचं नियंत्रण सुटल्यानं थेट घुसली चहाच्या टपरीत

First published: May 26, 2019, 12:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading