24 मार्च : चारा घोटाळ्यात चौथ्या प्रकरणात सीबीआय स्पेशल कोर्टाने लालू यादव यांना एकूण 14 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यासोबत त्यांना 60 लाखांचा दंड ठोठावला आहे. चार घोटाळ्याशी संबंधित चार प्रकरणात मिळून लालू प्रसाद यादव यांना 20 वर्ष 6 महिन्यांची शिक्षा झाली आहे. लालू प्रसाद यादव यांनी सोमवारी (19 मार्च) रांची न्यायालयाने चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणात दोषी ठरवले होते. या सुनावणीदरम्यान 12 जणांना दोषी ठरवण्यात आले होते तर 19 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
सीबीआय वकीलाने सांगितल्यानुसार, कोर्ट म्हणाले की,
'लालू यादव यांना आयपीसी आणि भ्रष्टाचार कायद्यांतर्गत 7-7 वर्षांच्या शिक्षेची घोषणा केली. दोन्ही शिक्षा वेगवेगळ्या भोगाव्या लागणार आहेत. शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा लालू यादव रिम्स हॉस्पिटलमध्ये होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते सुनावणीला हजर होते.
जज शिवपालसिंह यांनी 19 मार्च रोजी अवैधरित्या निधी काढल्या प्रकरणी लालू यांच्यासह 19 जणांना दोषी ठरवले होते. लालू यांच्यावर चारा घोटाळ्याच्या 6 केसेस सुरु आहे. यातील चौथ्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fodder scam, Lalu prasad, Ranchi court, Sentenced fourteen years imprisonment