जयाप्रदांवर टीका करताना आझम खान यांची जीभ पुन्हा घसरली, म्हणाले...

जयाप्रदांवर टीका करताना आझम खान यांची जीभ पुन्हा घसरली, म्हणाले...

उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातील जागेवरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

  • Share this:

लखनौ, 15 एप्रिल : उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातील जागेवरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार जयाप्रदा आणि सपा नेते आझम खान यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. रामपूरमधील शाहबाद जिल्ह्यात एका प्रचारसभेला संबोधित करताना आझम खान यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासमोरच जयाप्रदांवर टीका करताना आक्षेपार्ह विधान केलं. आझम खान म्हणाले की,'राजकारण इतक्या खालच्या स्तरावर पोहोचलं आहे का? ज्यांनी 10 वर्ष रामपूरवासीयांचं रक्त शोषलं, ज्यांना बोट पकडून आम्ही रामपूरमध्ये आणलं. त्यांनी आमच्यावर नको-नको ते आरोप केले. त्यांचा खरा चेहरा ओळखण्यासाठी तुम्हाला 17 वर्ष लागली, मी 17 दिवसांमध्येच ओळखलं होतं  की यांची अंडरवेअर खाकी रंगाची आहे. तुम्ही त्यांना मतदान करणार का?. दरम्यान, हे विधान करताना आझम खान यांनी जयाप्रदा यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता.

ते पुढे असंही म्हणाले की, मी माझ्या हयात नसलेल्या आईची शपथ घेऊन सांगितलं की माझ्यावर करण्यात आलेले हे सर्व आरोप खोटे आहेत.

या विधानावरून चौफेर टीका सुरू झाल्यानंतर आझम खान यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, जर मी दोषी आढळलो तर लोकसभा निवडणूक लढवणार नाही.

तर यापूर्वी एका प्रचारसभेदरम्यान जया प्रदा यांनी म्हटलं की, 'आझम खान यांना मी भाऊ मानलं होतं. पण त्यांनी बहिणीला शाप दिले. त्यांनी संपूर्ण देशभरात माझा अपमान केला. आझम खान माझा बळी देऊ शकतात. हा माणूस शुद्धीत नाहीय, ते काहीही करू शकतात'.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करतानाही जया प्रदा भावूक झाल्या होत्या. जनतेला संबोधित करताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी मंदिरात पूजादेखील केली. यानंतर एका सभेला संबोधित करताना त्यांनी म्हटलं होतं की, 'मी गरिबांसाठी काम करू इच्छिते, पण ही लोक मला काम करू देत नाहीत. यांच्याविरोधात काहीही केलं की काम करणाऱ्यांची कारागृहात पाठवणी केली जाते'

वाचा अन्य बातम्या

SPECIAL REPORT: एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात कोण सरस?

VIDEO: रामनवमीच्या कार्यक्रमात राऊत म्हणतात; 'भाड में गया कानून, भाड में गई आचारसंहिता'

VIDEO: 'हिंदू राष्ट्र बनाना है, हे वाचून मनाला वेदना होतात'

VIDEO: रामनवमीच्या कार्यक्रमात राऊत म्हणतात; 'भाड में गया कानून, भाड में गई आचारसंहिता'

First published: April 15, 2019, 7:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading