मुलाचं वडिलांच्या पावलावर पाऊल, जयाप्रदांना 'अनाकरली' म्हणत उडवली खिल्ली

मुलाचं वडिलांच्या पावलावर पाऊल, जयाप्रदांना 'अनाकरली' म्हणत उडवली खिल्ली

वडील आझम खान यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा आणि सपा नेता अब्दुल्ला खाननंही आता जयाप्रदावर यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • Share this:

लखनौ, 22 एप्रिल : वडील आझम खान यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा आणि सपा नेता अब्दुल्ला खाननंही आता जयाप्रदावर यांच्यावर निशाणा साधला आहे. रामपूरमधील जाहीर सभेदरम्यान अब्दुल्ला खान यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार जयाप्रदा यांची खिल्ली उडवली.

'आम्हाला बजरंगबली आणि अली हवेत आहेत, मात्र अनारकली नको', असं म्हणत अब्दुल्ला खान यांनी जयाप्रदा यांच्यावर टीका केली.

जयाप्रदांवर त्यांच्या भूतकाळासंदर्भात टीका करताना अब्दुल्लांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक आरोपांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की,' जिथे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचीच प्रतिमा धोक्यात आहे, तर मग इथे मी तर काहीच नाहीय आणि आमच्यासोबत काही होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे. लोकशाहीचं संरक्षण करा आणि देशाच्या संवैधानिक संस्था वाचवण्याचं मी तुम्हाला आवाहन करतो.'

दरम्यान, यावेळेस त्यांनी जिल्हा प्रशासनावरही आरोप केले आहेत. अब्दुल्ला खान म्हणाले की,' स्थानिक प्रशासन भाजप उमेदवाराला मदत करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यांनी सपा कार्यकर्त्यांना खोटे गुन्ह्यांमध्ये अडकवलं आहे. माझ्या समर्थकांच्या घरावर छापा टाकला जात आहे. समर्थकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. जेणेकरून मुस्लिमबहुल परिसरातील मतदानाचा टक्का घसरेल आणि याचा थेट फायदा भाजपला होईल.'

दरम्यान, निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आझम खान आणि जयाप्रदा यांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केलेत.

VIDEO : पंतप्रधान मोदींना अजित पवारांनी काढला चिमटा

First published: April 22, 2019, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading