आझम खान यांच्यावर भडकल्या जयप्रदा, केला हा आरोप

आझम खान यांच्यावर भडकल्या जयप्रदा, केला हा आरोप

'आझम खान यांनी महिलांबद्दल जे उद्गार काढले त्यामुळे त्यांना भाऊ असं म्हणणं हा गुन्हाच आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 1 जुलै : जयाप्रदा या समाजवादी पक्ष सोडून भाजपमध्ये आल्या तरी त्यांचं आणि खासदार आझम खान यांचं भांडण संपलेलं नाही. आझम खान यांनी जयाप्रदा यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी आज उत्तर दिलं. आझम खान हे सत्तेचे भुकेले आहेत. त्यांना सत्तेपासून दूर राहताच येत नाही. त्यांनी महिलांबद्दल जे उद्गार काढले त्यामुळे त्यांना भाऊ असं म्हणणं हा गुन्हाच आहे अशी टीकाही त्यांनी केलीय.

जयाप्रदा या रामपूरच्या दोन वेळा  खासदार होत्या. भाजपने त्यांना लोकसभेचं तिकीटही दिलं होतं मात्र नुकत्याचं झालेल्या निवडणुकीत त्यांचा आझम खान यांनी पराभव केला होता. जयाप्रदा म्हणाल्या, आझम खान यांची पत्नी खासदार आहे, त्यांचा मुलगा आमदार आहे सगळी सत्ता त्यांनाच पाहिजे आहे. मात्र त्यांची मानसिकता अतिशय मागसलेली आहे असा आरोपही त्यांनी केला.

'मी राजीनाम्यावर ठाम!' राहुल गांधींची मनधरणी करण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश

काँग्रेसचा शोध संपला?

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांची मनधरणी करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यातच आता सोनिया गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी एका नेत्याला फोन केल्याची खबर आहे.

संसदेच्या अधिवेशनानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत याची औपचारिक घोषणा केली जाईल, असं बोललं जात आहे. सोनिया गांधींनी हा फोन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना केला आहे, अशी माहिती आहे.

NEET 2019 Counselling : पहिल्या फेरीचा निकाल आज

सुशीलकुमार शिंदेंची पक्षनिष्ठा

सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सुशीलकुमार शिंदेंनी यूपीए सरकारमध्ये महत्त्वाची पदं भूषवली आहेत. महाराष्ट्रामध्ये ते आणि विलासराव देशमुख यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा सुरू झाली तेव्हा पक्षाने सुशीलकुमार शिंदेंना आंध्र प्रदेशचं राज्यपाल बनवलं. पण सुशीलकुमार शिंदेंनी याबद्दल एका शब्दानेही नाराजी व्यक्त केली नव्हती.

First published: July 1, 2019, 7:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading