कारागृहात 12 वर्षे काढल्यानंतर निर्दोष मुक्तता, CRPF कँपवर हल्ल्याचा होता आरोप

कारागृहात 12 वर्षे काढल्यानंतर निर्दोष मुक्तता, CRPF कँपवर हल्ल्याचा होता आरोप

सीआरपीएफ कँपवर हल्ला केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी ताब्यात घेत थेट कारागृहात रवानगी केली होतं.

  • Share this:

बरेली, 03 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील रामपुरमध्ये सीआरपीएफ कँपवर हल्ल्याप्रकरणाचा निकाल न्यायालयाने शुक्रवारी दिला. यामध्ये गुलाब खान यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तब्बल 12 वर्षे तुरुंगात काढल्यानंतर शनिवारी त्यांना सोडण्यात आलं. सध्या 48 वर्षांचे असलेले गुलाब खान यांनी देवानं नवं आयुष्य दिलं असं म्हटलं आहे.  गुलाब खान यांना नेण्यासाठी त्यांचे भाऊ कारागृहाबाहेर आले होते.

निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गुलाब खान म्हणाले की, दहशतवादी हल्ल्याशी माझा काही संबंध नव्हता पण मला यात अडकवण्यात आलं होतं. जेव्हा मला या गुन्ह्यासाठी अटक झाली तेव्हा सगळं संपलं असंच वाटलं. मला वाटलं माझं आयुष्य आणि कुटुंब संपलं. दहशतवादी हल्ल्यात अडकवल्याचा विचारचं भीतीदायक होता असंही ते म्हणाले.

इतक्या वर्षांत मला काळजी वाटत होती की हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होईल.  पण आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर देवाचे आभार मानले. मोकळ्या हवेत श्वास घेऊन चांगलं वाटत आहे. आता नवी सुरुवात करणार असं खान यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशातील बाहेरीमध्ये खान यांचे वेल्डिंग दुकान होतं. त्यांना फेब्रुवारी 2008 मध्ये अटक करण्यात आलं होतं. त्यांच्याविरुद्ध दहशतवादी हल्ल्यात सामिल असल्याचा आणि घरात शस्त्रास्त्रे ठेवल्याचा आरोप होता. यामध्ये त्यांचे नातेवाइक मोहम्मद शरीफला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. खान यांनी सांगितले की, 10 फेब्रुवारी 2008 ला पोलिसांनी मला घरातून ताब्यात घेतलं. बरेली प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यासाठी पकडल्याचं मला सांगण्यात आलं. तेव्हा मी अनेक महिन्यांपासून बरेलीला गेलोच नाही असं सांगितल्यावरही मला नेण्यात आलं.

पोलिसांनी ठाण्यात घेऊन जाण्याऐवजी गेस्ट हाऊसला नेलं आणि तिथंच ठेवलं. त्यानंतर संध्याकाळी रामपुरमधील एका पोलिस स्टेशनमध्ये आणि एका वैद्यकीय तपासणासाठी नेलं. तिथून थेट कारागृहात पाठवण्यात आलं. मला अटक का करण्यात आली असं विचारलं तर तुरुंगात गेल्यावर समजेल असं उत्तर मिळाल्याचं खान यांनी सांगितलं.

निर्दोष मुक्तता झाल्यानंतर खान म्हणाले की, त्यांच्या अटकेनंतर पत्नीला शिवणकाम करावं लागलं. मुलांच्या देखभालीचा खर्च, शिक्षण याशिवाय आर्थिक अडचणींचा सामना कुटुंबाला करावा लागला. आईलासुद्धा गमावलं आणि तिच्या अंत्यसंस्कारालाही जाता आलं नाही. न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. आता सरकारला विनंती आहे की, मानवाधिकाराच्या आधारे मला आणि माझ्या कुटुंबाला मदत केली जावी. यामुळे आम्ही सन्मानाने जगू शकू.

वाचा : मुंबईच नाही तर ही शहरंही पाण्याखाली बुडण्याचा धोका

वाचा : कलम 370 नंतरचा मोठा निर्णय, मोदी सरकारने प्रसिद्ध केला भारताचा नवा नकाशा!

 

VIDEO : संजय राऊत यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2019 03:16 PM IST

ताज्या बातम्या