राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी

राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी

रामनाथ कोविंद सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. रामनाथ कोविंद हे दलित समाजातून आलेत. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर केलं.

  • Share this:

19 जून : राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामनाथ कोविंद सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. रामनाथ कोविंद हे दलित समाजातून आलेत. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर केलं.

भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. एनडीएच्या सर्व घटकपक्षांना ही माहिती देण्यात आल्याचं अमित शहा यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रपती उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपाच्या संसदीय मंडळाच्या दिल्लीत बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष, अमित शाह, अरुण जेटली, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, रामलाल, सुषमा स्वराज,  जे. पी. नड्डा, थावरचंद गहलोत, वेंकैया नायडू, अनंतकुमार असे भाजपचे सर्वच प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.

First published: June 19, 2017, 2:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading