रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती

रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती

रामनाथ मैकूलाल कोविंद हे देशाचे नवे राष्ट्रपती झाले आहेत. त्यांना 7 लाख 2 हजार 44 मतं मिळाली. एकूण 66 टक्के मतं त्यांनी मिळवली.

  • Share this:

20 जुलै :राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखेर रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. 7 लाख 2 हजार 44 मतांनी विजय होत रामनाथ कोविंद भारताचे 14 वे राष्ट्रपती ठरले आहे. रामनाथ कोविंद यांच्या विरोधात उभ्या असलेल्या यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांना 34 टक्के मतं मिळाली. 26 जुलैला रामनाथ कोविंद राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.

रामनाथ मैकूलाल कोविंद हे देशाचे नवे राष्ट्रपती झाले आहेत. त्यांना 7 लाख 2 हजार 44 मतं मिळाली. एकूण 66 टक्के मतं त्यांनी मिळवली. मीरा कुमार यांचा पराभव करून ते आता काही दिवसांतच राष्ट्रपती भवनाचे रहिवासी होतील.

कोविंद हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. 1994 ते 2006पर्यंत ते राज्यसभेचे खासदार होते. त्याआधी ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. पेशाने ते वकील आहेत. आयएएससाठीही त्यांची निवड झाली होती. पण त्यांनी ती नोकरी स्वीकारली नाही. त्याऐवजी त्यांनी लॉमध्ये करिअर करायचं ठरवलं. दिल्ली हायकोर्टात केंद्र सरकारचे वकील म्हणून त्यांनी 2 वर्षं काम केलं. पत्नी सविता, एक मुलगी स्वाती आणि मुलगा प्रशांत कुमार असा त्यांचा परिवार आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणुकीत एकूण मतदान 4851 झालं त्यांचं मुल्य 1090300 इतकं आहे. यातील  77 मतं बाद करण्यात आली. राष्ट्रपतीपदाची निवडणुकीच्या बहुमतासाठी 534680 मतांची आवश्यकता होती. कोविंद यांनी   702044 मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला.

पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी कोविंद यांचं अभिनंदन केलं. रामनाथ कोविंद यांना मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आपण समाधानी आहोत. असं मोदी यांनी टिवट् केलंय. तसंच त्यांनी मीरा कुमार यांनी लोकशाही तत्वांचा मान राखत निवडणूक लढवली याबद्दल अभिनंदन केलं.

ममता बॅनर्जी यांनी केलं अभिनंदन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टि्वट करून कोविंद यांचं अभिनंदन केलं. कोविंद हे आपल्या देशाचे राष्ट्रपती असणार आहे असंही त्यांनी टि्वटमध्ये म्हटलंय. विशेष म्हणजे ममतादीदींनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मीरा कुमार यांना समर्थन दिलं होतं.

11 राज्यांमध्ये अशी मिळाली मतं

आंध्र प्रदेश

 रामनाथ कोविंद - 27189

 मीरा कुमार - 0

अरुणाचल प्रदेश

 कोविंद - 448

 मीरा कुमार -24

आसाम

कोविंद - 10556,

मीरा कुमार - 4060

बिहार

कोविंद -22490

मीरा कुमार -18867

छत्तीसगड

कोविंद- 6708

मीरा कुमार- 4515

गोवा

कोविंद- 500

 मीरा कुमार- 220

गुजरात

 कोविंद- 19404

मीरा कुमार- 7203

हरियाणा

 कोविंद- 8176

 मीरा कुमार- 1792

हिमाचल प्रदेश

 कोविंद - 1530

 मीरा कुमार - 1887

जम्मू आणि कश्मीर

 कोविंद - 4032

मीरा कुमार - 2160

झारखंड

 कोविंद - 8976

 मीरा कुमार - 4576

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2017 04:25 PM IST

ताज्या बातम्या