राम मंदिर बांधा, नाही तर लोकांचा विश्वास गमावाल : रामदेव बाबांचा भाजपला इशारा!

राम मंदिर बांधा, नाही तर लोकांचा विश्वास गमावाल : रामदेव बाबांचा भाजपला इशारा!

बाबा रामदेव हे भाजपचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांनी भाजपला खडे बोल सुनावण्यासही कमी केलं नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना राम मंदिर का बांधलं जात नाही? भाजप जर मंदिर बांधू शकत नसेल तर लोकांचा भाजपवरचा विश्वास उडेल असा इशारा बाबा रामदेव यांनी केंद्र सरकारला दिलाय. कारसेवक राम मंदिराचं बांधकाम सुरू करू शकत नाहीत. कारण तसं झालं तर तो कोर्टाचा अवमान ठरेल. त्यामुळं सरकारनं तातडीने अध्यादेश काढावा असं आवाहनही त्यांनी सरकारला केलं आहे.


बाबा रामदेव हे भाजपचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांनी भाजपला खडे बोल सुनावण्यासही कमी केलं नाही. आता राम मंदिराच्या प्रश्नावरूनही त्यांनी सरकारचा कान धरलाय. राम मंदिर बांधण्याचं आश्वासन भाजप प्रत्येक निवडणुकीत देत असतो. त्यामुळे ते आश्वास त्यांनी पूर्ण करावं अशी मागणी रामदेव यांनीच नाही तर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनीही केली आहे.


25 नोव्हेंबरला नागपुरात झालेल्या हुंकार रॅलीत खुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनीच सरकारवर दबाव आणावा असं आवाहन लोकांना केलं होतं. आत्तापर्यंत खूप वाट पाहिली, लोक आता थांबणार नाहीत. न्याय देण्याला विलंब करणं म्हणजे न्याय नाकारणं होय. त्यामुळं न्यायालयानं विचार केला पाहिजे असं भागवत म्हणाले होते.


तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अयोध्येत जावून थेट सरकारला आव्हान दिलं होतं. आता आश्वासनं नको मंदिर बांधा असं त्यांनी सरकारला सांगितलं होतं. त्यामुळं यापुढच्या काळात केंद्र सरकार आणि भाजपवरचा लोकांचा दबाव वाढत जाणार आहे.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 09:41 PM IST

ताज्या बातम्या