अयोध्येत रामललाच्या खात्यावर आहेत इतके कोटी!

अयोध्येत रामललाच्या खात्यावर आहेत इतके कोटी!

अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे.

  • Share this:

अयोध्या, 09 नोव्हेंबर : अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज निकालपत्राचे वाचन होणार आहे. या ऐतिहासिक प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, रामललाच्या खात्यावर 7 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत भाविकांनी देणगीपेटीत टाकलेली ही रक्कम आहे. जानेवारी 1993 मध्ये अधिग्रहण केल्यानंतर रामललाच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडण्यात आलं. त्यानंतर होणारा खर्च वगळून उरलेले पैसे खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली. पहिल्यांदा 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत असलेली देणगी काही वर्षांत 5 ते 6 लाख रुपये महिना इतकी झाली.

अधिग्रहण करण्यात आलेल्या परिसराची जबाबदारी प्रशासनाने नियुक्त केलेल्या व्यक्तीकडून केली जाते. त्यांच्याच देखरेखीखाली इथं जमा होणाऱ्या देणगीतून रामललाचा खर्च केला जातो. यामध्ये पुजा करणाऱ्यांचा खर्च, पूजनाचं साहित्य, नैवद्य यासाठी महिन्याला जवळपास एक लाख रुपयांचा खर्च केला जातो. राम जन्मोत्सवासाठी 51 हजार आणि श्रावणात मेळ्यासाठी 11 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च होतो. सध्या देशातील इतर श्रीमंत देवस्थानांच्या तुलनेत हा खर्च आणि जमा होणारी रक्कम कमी आहे.

मंदिर-मस्जिद वादावर निर्णयाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहली आहे. अयोध्येतील मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्रदास यांना आशा आहे की राम भक्तांची संख्या कोटींच्या घरात आहे. मंदीर होताच रामललाच्या देणगीमध्ये कित्येक पटींनी वाढ होईल. यातून रामललाच्या संपत्तीत वाढ तर होईलच पण इतर सेवा आणि सुविधांचे प्रकल्प उभारता येतील.

राम मंदिर प्रकरण संवेदनशील असल्यामुळे अयोध्येमध्ये १० डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. तर तब्बल २०० शाळा २ महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे राम मंदिर आणि बाबरीचा वाद?

अयोध्येतील वादग्रस्त जागेवरच प्रभू रामचंद्रांचा जन्म झाल्याची धारणा आहे. 15 व्या शतकात प्रभू रामचंद्रांचं मंदिर पाडलं गेलं असाही आरोप आहे. 15 व्या शतकात मंदिर पाडून त्याजागी बाबरी मशीद उभारली गेली असाही आरोप आहे. 1885 मध्ये पहिल्यांदा हे सगळं प्रकरण न्यायालयाच्या दारात पोहचलं. महंत रघुबरदास यांनी फैजाबाद येथील न्यायालयात राम मंदिराच्या निर्मितीसाठी अपिल केलं. 6 डिसेंबर 1992 रोजी हजारो कारसेवकांनी अयोध्येत पोहचत बाबरी मशिद पाडली. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबितच आहे.

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

Published by: Suraj Yadav
First published: November 9, 2019, 7:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading