Home /News /national /

रामलल्लाचं होणार ऑनलाइन दर्शन, लॉकडाऊनमुळे श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचा निर्णय

रामलल्लाचं होणार ऑनलाइन दर्शन, लॉकडाऊनमुळे श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचा निर्णय

रामभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामलल्लाच्या भक्तांना घरी बसूनच रामलल्लाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे

    नवी दिल्ली, 31 मार्च : कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्व महत्त्वाची देवस्थान बंद आहेत. त्यानंतर लॉकडाऊनमुळे सुद्धा अनेकांना घराबाहेर पडता येत नाही आहे. अशावेळी अनेक भाविकांना देवदर्शन करता येत नाही आहे. त्यामुळे रामभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामलल्लाच्या भक्तांना घरी बसूनच रामलल्लाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. कोरोनामुळे रामलल्लाचे दर्शन होत नसल्यामुळे भाविंकामध्ये नाराजी आहे. आता ट्रस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून याठिकाणी होणारी प्रत्येक आरती आणि लाईव्ह करणार आहेत. त्यामुळे तुम्ही घरबसल्या दर्शन करू शकतात. (हे वाचा-पंतप्रधान करत आहेत ‘योगनिद्रे’चा अभ्यास, लॉकडाऊमध्ये तुम्ही करू शकता ‘या' गोष्टी) मंदिर निर्माण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर यावर्षी अनेक रामभक्त रामनवमीसाठी अयोध्येत दाखल होणार होते. पण लॉकडाऊनमुळे भाविकांच्या या सगळ्या योजना रद्द झाल्या आहेत. रामलल्लाच्या जन्मोत्सवात भक्तांना सामील होता आले नाही. अयोध्येत रामलल्लाचे दर्शन देखील बंद आहे. त्यामुळे श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट ने रामभक्तांसाठी हा विशेष निर्णय घेतला आहे. यामुळे आजपासून रामभक्त घरी बसूनच मोबाइल, लॅपटॉप किंवा कंप्यूटरवर रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतात. (हे वाचा- विद्यार्थ्याच्या कर्तृत्वाला सलाम, साठवलेले 11 हजार दिले पंतप्रधान मदत निधीला) श्रीराम जमभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आजपासून फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रामलल्लाच्या श्रृंगार दर्शनाचं प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज सकाळी रामलल्लाच्या शृंगाराचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात .येईल. रामनवमी आणि त्यानंतरही हे प्रसारण सुरू राहणार आहे. 25 मार्चला चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अस्थायी भवनाच रामलल्लाची स्थापना करण्यात आली आहे. 2 एप्रिलला रामनवमीचा उत्सव आहे. दरवर्षी याठिकाणी मोठी गर्दी होते. मात्र यावेळी कोरोनाच्या संकटामुळे झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम या गर्दीवर झालेला पाहायला मिळत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या