'या' विधानामुळे रामदेव बाबांवर अमेरिकी कंपनी आणि वैद्यकीय क्षेत्र नाराज!

'या' विधानामुळे रामदेव बाबांवर अमेरिकी कंपनी आणि वैद्यकीय क्षेत्र नाराज!

रामदेव बाबा या परिषदेचे प्रमुख अथिती होते. आणि ते या परिषदेत कॅन्सरविषयी मार्गदर्शन करणार होते. पण या अमेरिकन स्पॉन्सर कंपनीसोबतच काही वैद्यकिय क्षेत्रातूनही रामदेव बाबांच्या येण्यावर नाराजी दाखवली.

  • Share this:

08 फेब्रुवीरी : 'कॅन्सर हा आपल्या वाईट कर्मांमुळे आणि पाप केल्यामुळे होतो.' अशा विधानामुळे योग गुरु बाबा रामदेव यांना आयआयटी मद्रासमधील कॅन्सरवरील आंतरराष्ट्रीय परिषदेतून आपलं नाव मागे घ्यावं लागलं. खरंतर अमेरिकेची एक कंपनी या परिषदेसाठी स्पॉन्सर देणार होती. पण बाबा रामदेव या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असल्याचं कळल्यास त्यांनी स्पॉन्सर करण्यास नकार दिला.

रामदेव बाबा या परिषदेचे प्रमुख अथिती होते. आणि ते या परिषदेत कॅन्सरविषयी मार्गदर्शन करणार होते. पण या अमेरिकन स्पॉन्सर कंपनीसोबतच काही वैद्यकिय क्षेत्रातूनही रामदेव बाबांच्या येण्यावर नाराजी दाखवली.

कारण मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये रामदेव बाबा यांनी आसामचे आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या एका विधानाचे समर्थन केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, 'वाईट कर्म केले की कॅन्सर होतो' आणि त्यांच्या या विधानाचं रामदेव बाबा यांनी समर्थन केलं होतं.

बाबा रामदेव म्हणाले की, 'जे वाईट कर्म करतात आणि पाप करतात त्यांना कॅन्सर होतो.' बाबा रामदेव यांच्या या समर्थनामुळे आणि विधानामुळे अमेरिकी कंपनी आणि अनेक वैद्यकीय क्षेत्र बाबा रामदेव यांच्यावर नाराज आहेत. आणि म्हणून रामदेव बाबांकडून या परिषदेच्या प्रमुख अतिथींचा मान काढून घेण्यात आला.

First Published: Feb 8, 2018 10:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading