20 जून : उद्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याची जय्यत तयारीही ठिकठिकाणी सुरू आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्येही योगगुरू बाबा रामदेव यांनी योग शिबीर आयोजित केलं आहे. वजन कमी करण्यासाठी योग कसं उपयुक्त आहे, याची अनेक उदाहरणं बाबा रामदेव यांनी दिली. त्यासाठी त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांचंही उदाहरण दिलं. शहा यांनी योग करून आपलं २० किलो वजन कमी केलं, असं त्यांनी सांगितलं.
जे लोक योगा शिकत नाहीत, पण, योगाला नावे ठेवतात. तसेच, योगाला खेळाचा दर्जा देत नाहीत, असे लोक याबाबतील अज्ञान आहेत. अशा विचारांच्या लोकांना केव्हाही योगा म्हणजे काय, हे पटवून देऊ नये. ऑलिम्पिक खेळांमध्ये योगाचा समावेश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही, रामदेव बाबा म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा