'...असं केलं तर राहुल गांधींचे अच्छे दिन येतील', रामदेव बाबांची मिश्किल टिप्पणी

'...असं केलं तर राहुल गांधींचे अच्छे दिन येतील', रामदेव बाबांची मिश्किल टिप्पणी

'एक मोदी बँकेत पैसा जमा करत आहेत तर दुसरा मोदी पैसे घेऊन पळुन जातो' अशी टीकाही रामदेव बाबा यांनी पंतप्रधानांवर केली आहे.

  • Share this:

20 फेब्रुवारी : राहुल गांधींच्या आई म्हणजेच सोनिया गांधी प्राणायाम करतात. तर त्यांच्या आजी इंदिरा गांधी योग करायच्या. नेहरुदेखील शीर्षासन करायचे. या सगळ्यांप्रमाणे राहुल गांधींनी योग केल्यास त्यांचे अच्छे दिन येतील. अशी मिश्किल टिप्पणी रामदेव बाबा यांनी केली आहे. ते चंद्रपुरात बोलत होते. यावेळी त्यांनी काळ्या पैशांवरही भाष्य केलं.

सरकारनं कायद्यानुसार काळया पैशावर कारवाई करावी. काळ्या मनाविरोधात मी स्वतः काम करतोय, असंही ते म्हणाले. 'एक मोदी बँकेत पैसा जमा करत आहेत तर दुसरा मोदी पैसे घेऊन पळुन जातो' अशी टीकाही रामदेव बाबा यांनी पंतप्रधानांवर केली आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाना साधत पीएनबी बँक घोटाळ्या संदर्भात ट्विट केलं आहे. त्यामुळे राहुल गांधी रामदेव बाबांच्या टिप्पणवर काय प्रतिक्रिया देतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2018 11:29 AM IST

ताज्या बातम्या