बाबा रामदेव यांच्या निधनाची बातमी खोटी

रामदेव बाबांचं अपघाती निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, ही निव्वळ अफवा असून रामदेव बाबा सुखरूप आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2017 09:52 PM IST

बाबा रामदेव यांच्या निधनाची बातमी खोटी

25 एप्रिल : योगगुरू बाबा रामदेव यांचं निधन झाल्याची बातमी सोशलमीडियावर व्हायरल झालीये. रामदेव बाबांचं अपघाती निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, ही निव्वळ अफवा असून रामदेव बाबा सुखरूप आहे.

हल्ली सोशलमीडियावर काय व्हायरल होईल याचा नेम नाही. याचा बळी पडले ते योगगुरू बाबा रामदेव. रामदेव बाबा यांचं बिहारमध्ये अपघाती निधन झालंय. त्यांना एका अॅम्ब्युलन्सने हाॅस्पिटलने घेऊन जात असल्याचा फोटोही याबातमीसोबत व्हाॅयरल झाला आहे. बाबा रामदेव यांचं निधन झाल्याच्या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांनी रामदेव बाबा आणि पतंजली ट्रस्टला फोन करून याबद्दल विचारणाही केली.

आता पतंजली ट्रस्टकडूनच एक पत्रक जारी करण्यात आलं असून या बातमीचं खंडन केलंय. पतंजलीचे प्रवक्ते तिजारावाला यांनी सांगितलं की, सोशलमीडियावर हा कुणी तरी खोडसाळपणा केलाय. बिहारमध्ये झालेल्या अपघाताचा फोटो आणि 2011 मध्ये पतंजलीच्या जाॅलिग्रांड हाॅस्पिटलमध्ये बाबा रामदेव यांना उपचारासाठी घेऊन जात असतानाचा फोटो एकच आहे.

सोशल मीडियावर उगाच जुना फोटो आजच्या अपघाताचा असल्याचं दाखवलं जात आहे. हे खोटं आहे. रामदेव बाबांची प्रकृती ठणठणीत आणि उत्तम आहे असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2017 09:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...