सैन्य दलात दलित, आदिवासींना आरक्षण द्यावं -रामदास आठवले

सैन्य दलात दलित, आदिवासींना आरक्षण द्यावं -रामदास आठवले

  • Share this:

15 आॅगस्ट : भारतीय सैन्यदलात दलित आदिवासींना आरक्षण देण्यात यावं अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी केलीये.

आठवले यांना मिळालेल्या दिल्लीतील 11 सफदरगंज रोड येथील नव्या निवासस्थानी सकाळी 70 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना भारतीय सैन्याच्या तिन्ही दलात दलित,आदिवासी आणि ओबीसींना आरक्षण देणे आवश्यक असल्याचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.

First published: August 15, 2017, 8:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading