नवी दिल्ली, 19 जून : भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची आज लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी सर्वच पक्षांच्या सदस्यांनी त्यांनी शुभेच्छा देत कौतुक केलं. केंद्रीय मंत्री रामसाद आठवले यांनी केलेल्या भाषणाने सर्व सभागृहच हास्यकल्लोळात बुडालं. त्यात आजच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा वाढदिवस असल्याने रामदास आठवलेंनी त्यांना खास त्यांच्या शैलीत शुभेच्छा दिल्या त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांनाही हसू आवरता आलं नाही.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना त्यांनी कविताच केली, आठवलेंच्या या कवितेने सगळेच हसायला लागले, आठवले म्हणाले, एक देश का नाम है रोम, लेकिन लोकसभा के अध्यक्ष बन गए हैं बिड़ला ओम. लोकसभा का आपको अच्छी तरह से चलाना है काम, वेल में आने वालों का ब्लैकलिस्ट में डालना है नाम. नरेंद्र मोदीजी और आपका दिल है विशाल, राहुलजी आप रहो खुशहाल. हम सब मिलकर हाथ में लेते हैं एकता की मशाल, और भारत को बनाते हैं और भी विशाल. आपका राज्य है राजस्थान, लेकिन लोकसभा की आप बन गए हैं शान, भारत की हमें बढ़ानी है शान, लोकसभा चलाने के लिए आप हैं पर्फेक्ट इंसान'.
आठवले यांनी राहुल गांधी यांचीही फिरकी घेतली. ते म्हणाले, तुमची सत्ता असताना मी तुमच्यासोबत होतो. तेव्हाच मला हवेचा रोख कळला होता. नरेंद्र मोदी यांची हवा होती त्यामुळे मी मोदींसोबत गेलो. यापुढची पाचवर्ष तुम्ही तिथेच बसा. नंतरही आमचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. आठवले काय बोलताहेत हे सोनिया गांधी कळत नव्हतं. त्यावेळी राहुल गांधी त्यांना त्याचा अर्थ सांगत होते. त्यानंतर सोनिया गांधीही हसायला लागल्या.