टीम इंडियाच्या जर्सीचा रंग भगवा करण्यावर काय म्हणाले मोदींचे हे मंत्री

भारतीय क्रिकेट संघाच्या अर्थात टीम इंडियाच्या जर्सीचा रंग भगवा करण्याच्या मुद्यावरून देशात राजकारण सुरु झाले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यात उडी घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2019 08:53 PM IST

टीम इंडियाच्या जर्सीचा रंग भगवा करण्यावर काय म्हणाले मोदींचे हे मंत्री

नवी दिल्ली, 26 जून- भारतीय क्रिकेट संघाच्या अर्थात टीम इंडियाच्या जर्सीचा रंग भगवा करण्याच्या मुद्यावरून देशात राजकारण सुरु झाले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यात उडी घेतली आहे. 'भगवा' रंग तर बौद्ध धर्मातील भिक्षुच्या वस्त्राचा आहे. एवढेच नाही भगवा हा शौर्य आणि विजयाचा रंग आहे.

अबू आझमींनी नरेंद्र मोदींवर केले हे आरोप..

वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बदलला आहे. मोदी हे देशाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केला आहे. अबू आझमी यांच्या या आरोपावर शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी सवाल उपस्थित केला आहे. "भारतीय संघाच्या जर्सीवरून नाहक राजकारण सुरु आहे. आम्ही तिरंग्यात हिरवा रंग नको, याविषयी कधी बोललो का?", असा सवाल केला आहे.

बीसीसीआयने निवडला जर्सीचा रंग

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, संघाच्या जर्सीचा रंग निवडण्याचा अधिकार हा बीसीसीआयकडे होता. बीसीसीआयला जो रंग योग्य वाटला त्यांनी तो दिला. भारतामध्ये भगव्या रंगाची जर्सी तयार करण्यात आली आहे.

Loading...

काय आहे आयसीसीचा नियम

आयसीसीचे प्रत्येक संघाच्या जर्सीबाबत काही नियम आहेत. या नियमानुसार एकाच रंगाची जर्सी घालून दोन संघांना सामन्यात उतरता येत नाही. त्यासाठी एका संघाच्या जर्सीचा रंग बदलला जातो. फुटबॉलच्या सामन्यात या नियमाचा वापर केला जातो. त्याच धर्तीवर क्रिकेटमध्ये हा नियम आयसीसीने अवलंबला आहे. इंग्लंडविरुद्ध भारत आणि अफगाणिस्तानला जर्सीचा रंग बदलावा लागेल. यात इंग्लंडला त्यांच्याच जर्सीत खेळण्याची मुभा आहे. वर्ल्ड कपचे यजमानपद इंग्लंडकडे असून त्यांना आहे. त्या जर्सीत खेळता येणार आहे.

इतर संघांनीही बदलले होते रंग

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध जर्सीचा रंग एकसारखा असल्याने पिवळ्या रंगाची जर्सी घातली होती. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजच्या संघांना जर्सी बदलण्याची गरज नाही. त्यांच्या जर्सीसारखा रंग इतर कोणत्या देशाचा नाही.

अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 26, 2019 08:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...