रामनाम घेत रामायण एक्सप्रेसने करा यात्रा, महाराष्ट्रात इथेही येणार ही ट्रेन

रामनाम घेत रामायण एक्सप्रेसने करा यात्रा, महाराष्ट्रात इथेही येणार ही ट्रेन

भारतीय रेल्वे रामायणाशी निगडित असलेल्या ठिकाणी एक विशेष ट्रेन घेऊन जाणार आहे. भारतातल्या ज्या भागांना 'रामायण सर्किट ऑफ इंडिया' असं म्हटलं जातं त्या भागात ही रामायण ट्रेन जाईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : भारतीय रेल्वे रामायणाशी निगडित असलेल्या ठिकाणी एक विशेष ट्रेन घेऊन जाणार आहे. भारतातल्या ज्या भागांना 'रामायण सर्किट ऑफ इंडिया' असं म्हटलं जातं त्या भागात ही रामायण ट्रेन जाईल.या 'रामायण एक्सप्रेस' चं वैशिष्ट्य म्हणजे या ट्रेनमध्ये रामायणातल्या कलाकृती असतील. रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, होळी पौर्मिणेनंतर ही ट्रेन सुरू करण्यात येईल.

हम्पी ते श्रृंगवेरपूर

या ट्रेनने हम्पी (Hampi), नाशिक (Nashik), चित्रकूट धाम (Chitrakut Dham), वाराणसी (Varanasi), बक्सर (Buxar), रघुनाथपुर (Raghunathpur), सीतामढ़ी (Sitamarhi), जनकपुरी (Janakpuri (Nepal), अयोध्या (Ayodhya), नंदीग्राम (Nandigram,) इलाहाबाद (Allahabad) आणि श्रृंगवेरपूर (Shringaverpur) अशी यात्रा करता येईल.

या ट्रेनने प्रवास केलात तर तुम्हाला काही विशेष सुविधा मिळतील. असं असलं तरी लाँड्री, औषधं या सुविधांसाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. त्याचबरोबर स्मारकांना भेट देण्यासाठी फी द्यावी लागेल.

(हेही वाचा : जगातल्या या सगळ्यात श्रीमंत माणसाने गर्लफ्रेंडला दिलं 1200 कोटींचं गिफ्ट)

यात्रेचा अवधी कमी करणार

या ट्रेनमध्ये तुम्हाला स्लीपर क्लासने प्रवास करता येईल. या यात्रेत धर्मशाळा, हॉल किंवा मल्टिशेअरींग तत्त्वावर निवासाची व्यवस्था केली जाईल. प्रवाशांना सकाळी चहा-कॉफीही दिली जाईल. त्याचबरोबर सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण अशीही सरबराई असेल. रामायण एक्सप्रेसच्या पॅकेज टूरचा अवधी कमी केला जाणार आहे कारण 14 दिवसांची सुटी मिळणं अशक्य होतं. याआधी नोव्हेंबर 2019 मध्ये पर्यटकांसाठी 14 दिवसांची यात्रा होती.

(हेही वाचा : 16 मार्चपासून बंद होणार ATM चे हे व्यवहार, हे आहे कारण)

===================================================================================

First published: February 14, 2020, 6:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading