Home /News /national /

राम मंदिराचा मुहूर्त ठरला...दोनपैंकी एका तिथीला मंदिराच्या उभारणीला सुरुवात

राम मंदिराचा मुहूर्त ठरला...दोनपैंकी एका तिथीला मंदिराच्या उभारणीला सुरुवात

मंदिराच्या उभारणीसाठी दोन मुहूर्त काढण्यात आले असून या तिथीला मंदिराच्या उभारणीला सुरुवात होणार आहे

    अयोध्या, 2 मार्च : अयोध्येत (Ayodhya) राम मंदिर (Ram Temple) बांधण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मंदिर बांधणीसाठी ट्रस्टचे गठनही करण्यात आले आहे. या ट्रस्टमध्ये 15 सदस्य आहेत. साधु-संतांबरोबरच अन्य सन्मानित नागरिक आणि नोकरदार वर्गालाही या ट्रस्टचे सदस्य बनविण्यात आले आहे. एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य सचिव म्हणून काम पाहणारे नृपेंद्र मिश्रा यांना ट्रस्टचे प्रमुखपद देण्यात आले आहे. मंदिर बांधणीच्या सुरुवातीपासून त्याची रुपरेखा कशी असावी यासंदर्भात ट्रस्टच्या अनेक बैठका झाल्या आहेत. अयोध्या मंदिराच्या बांधणीची तारीख आता होळीनंतर ठरविण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राची पुढील बैठकीत मंदिराच्या उभारणीची तारीख ठरविण्यात येईल. याबाबत नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, ‘मंदिराच्या उभारणीची तारीख ठरविण्यासाठी होणारी बैठक होळीनंतर आयोजित करण्यात येईल’. संबंधित - राम मंदिराच्या जागेवर होते कब्रिस्तान? पुजाऱ्यांनी सांगितला हा पर्याय राम मंदिराच्या भूमीपुजनाच्या तारखेचा विचार करण्यात येत आहे. यावेळी दोन तिथींचा विचार केला जात आहे. पहिली तिथी राम नवमी (2 एप्रिल) आणि दुसरी तिथी अक्षय तृतीय (26 एप्रिल). या दोघांपैकी कोणत्याही एका दिवशी मंदिर उभारणीचं काम सुरू होणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा १९६७ बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. गेल्या शुक्रवारी त्यांनी लखनऊ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि यादरम्यान मंदिर उभारणीबाबत चर्चा केली. विश्व हिंदू परिषदेने स्थापना केलेल्या रामजन्मभूमी न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष रामविलास वेदांती यांनी राम मंदिरसंदर्भात सांगितले, हे जगातील सर्वात मोठं मंदिर आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ होईल. यासाठी राम जन्मभूमी परिसरातील 67 एकर जमीन कमी पडेल. सरकारने गठन केलेल्या ट्रस्टला या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी मंदिर परिसरातील जवळील जमिनीचे अधिग्रहण करावे लागेल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Aayodhya, Ayodhya ram mandir

    पुढील बातम्या