राम रहीमचे 30 हजार समर्थक अजूनही मुख्य आश्रमात

राम रहीमचे 30 हजार समर्थक अजूनही मुख्य आश्रमात

समर्थकांना परत पाठवण्यासाठी प्रशासनानं बसेसची व्यवस्थाही केली होती.पण आज सकाळी जवळपास ५० बसेस आश्रमातून रिकाम्या परतल्या.

  • Share this:

अमित मोडक, 28 आॅगस्ट : बाबा राम-रहीमच्या शिक्षकेवर आज सुनावणी होणार आहे.तर दुसरीकडे बाबा राम-रहीमचे जवळपास ३० हजार समर्थक अजूनही डेरा सच्चा सौदाच्या मुख्य आश्रमात आहेत. समर्थकांना परत पाठवण्यासाठी प्रशासनानं बसेसची व्यवस्थाही केली होती.पण आज सकाळी जवळपास ५० बसेस आश्रमातून रिकाम्या परतल्या.

बाबा राम-रहीमचे समर्थक बसमध्ये बसायला तयार नसल्याचं चालकानं सांगितलं.त्यामुळे अजूनही ३० हजार समर्थक आश्रमात आहेत. जवळपास एक हजार एकरमध्ये पसरलेल्या या आश्रमाला छावणीचं स्वरुप आलंय. शिक्षेची सुनावणी झाल्यावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2017 01:15 PM IST

ताज्या बातम्या