राम रहीमला कोर्टात रडू कोसळलं

राम रहीमला कोर्टात रडू कोसळलं

कोर्टात निकालाचं वाचन सुरू असताना राम रहीमला रडू कोसळलं.

  • Share this:

28 आॅगस्ट : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावलीये. कोर्टात निकालाचं वाचन सुरू असताना राम रहीमला रडू कोसळलं. एवढंच नाहीतर त्याने कोर्टाची माफीही मागितली.

2002 मध्ये आपल्याच डेऱ्यातील 2 साध्वींवर बलात्कार प्रकरणी अखेर 15 वर्षांनंतर आज फैसला झाला. झुंडशाही आणि राजकीय संपर्काच्या बळावर राम रहीमने आतापर्यंत हे प्रकरण टाळण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्या दबावाला बळी न पडता पीडित साध्वींनी अखेरपर्यंत लढा दिला. आज पंचकुला सीबीआय कोर्टाने थेट तुरुंगातच कोर्टाची कार्यवाही सुरू करून बाबा रहीमचा फैसला सुनावला.  दोन्ही बाजूंच्या युक्तीवाद संपल्यानंतर न्यायाधीश जगदीश सिंह यांनी निकालाचं वाचन सुरू केल्यानंतर राम रहीम हात जोडून उभा होता. त्याने कोर्टाची माफी मागितली. निकालाचं वाचन सुरू असताना राम रहीमला रडू कोसळलं. लहान मुलासारखा राम रहीम रडत होता. त्याने दया याचना केली पण कोर्टाने तुझे कृत्य हे भयंकर आहे त्याला माफी देता येणार असं सांगून फटकारण्यात आलं. 20 ते 25 मिनिटांत सुनावणी पूर्ण झाली.

शिक्षा सुनावल्यानंतर त्याला तातडीने सामान्य कैद्याचे कपडे देण्यात आले. जशी इतर कैद्यांना वागणूक दिली जाते तशीच वागणूक देण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2017 04:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading