Home /News /national /

Ram Mandir: अयोध्येत दहशतवादी हल्ल्याचा धोका, गृहमंत्रालयाने दिला हाय अलर्ट!

Ram Mandir: अयोध्येत दहशतवादी हल्ल्याचा धोका, गृहमंत्रालयाने दिला हाय अलर्ट!

Ayodhya: Policemen conduct search of a motorcyclist at a barricade, as part of security measures on the eve of the 27th anniversary of the Babri Masjid demolition, near Hanumangarhi area in Ayodhya, Thursday, Dec. 5, 2019. (PTI Photo/Nand Kumar) 
(PTI12_5_2019_000140B)

Ayodhya: Policemen conduct search of a motorcyclist at a barricade, as part of security measures on the eve of the 27th anniversary of the Babri Masjid demolition, near Hanumangarhi area in Ayodhya, Thursday, Dec. 5, 2019. (PTI Photo/Nand Kumar) (PTI12_5_2019_000140B)

अयोध्येत प्रवेश करणाऱ्या सर्व गाड्यांची चौकशी करण्यात येत असून सुरक्षा दलाच्या जादा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

  अयोध्या 29 जुलै: अयोध्येत 5 ऑगस्टला राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमा पार्श्वभूमीवर दहशतवादी अयोध्येत हल्ला घडवून आणण्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हाय अलर्ट जारी केला असून अयोध्येत सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. अयोध्येत प्रवेश करणाऱ्या सर्व गाड्यांची तपासणी करण्यात येत असून सुरक्षा दलाच्या जादा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 ऑगस्टला सकाळी अयोध्येत येणार आहे. त्यामुळे सुरक्षा संस्था जास्तच अलर्ट झाल्या आहेत. 3 ते 5 ऑगस्ट या दरम्यान दहशतवादी हल्ला करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुप्तचर संस्थाही सक्रीय झाल्या असून सर्व खबरदारी घेण्यात येत असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. या भूमिपूजन कार्यक्रमाची सुरुवात 3 ऑगस्टपासूनच होणार आहे. काशीतले विद्वान यासाठी पौरोहित्य करणार आहेत. असा असेल कार्यक्रम 3 ऑगस्ट – गणेश पूजा 4 ऑगस्ट – रामार्चन 5 ऑगस्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन. 12.15 मिनिटांनी पंतप्रधान राम मंदिराच्या बांधकामाची पहिली वीट लावणार आहेत. देशात 34 वर्षानंतर जाहीर झालं शिक्षणाचं धोरण, असे आहेत 10 महत्त्वाचे बदल 9 नोव्हेंबर 2019 ला सुप्रीम कोर्टाने अयोध्येचा निकाल दिल्यानंतर राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हापासून तयारीला सुरुवात झाली आहे. 25 मार्च रोजी गर्भगृहावर असलेल्या मूर्तींना तात्पुरत्या मंदिरात स्थापित करण्यात आलं होतं. त्यानंतर मुळ गर्भगृहाची जागा समतल करण्यात आली होती. भूमिपूजनाचा कार्यक्रम निट नेटका व्हावा यासाठी उत्तर प्रदेश सरकार कामाला लागलं आहे. राम मंदिराच्या चळवळीत ज्या नेत्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांना या भूमिपूजन कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलं आहे. 161 फुटांचे हे मंदिर असणार आहे आणि त्याला पाच घुमट असतील. गेल्या काही दशकांपासून मंदिरासाठी लागणाऱ्या खांबांचं काम कारसेवकपूरम इथं सुरु होतं. त्याचाच वापर आता केला जाणार आहे. या बांधकामात देशातल्या लोकांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे. मोदी सरकारचा शिक्षण पद्धतीत मोठा बदल; यापुढे नसेल 10वी 12 वी बोर्डाची परीक्षा राम मंदिराचं गर्भगृह असलेल्या जागेवर 200 फुटांखाली ‘टाइम कॅप्सुल’मध्ये  राम मंदिराचा इतिहास ठेवला जाणार असल्याचं राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे (Ram Janmbhumi Teerth Kshetra Trust) सदस्य कामेश्वर चौपाल यांनी म्हटलं होत. त्यानंतर जोरदार चर्चा सुरु झाली होती. मात्र ट्रस्टचे महासचिव आणि प्रवक्ते चंपत राय यांनी मात्र अशी कुठलीही कॅप्सुल ठेवली जाणार नसल्याचं म्हटलं आहे. चंपत राय म्हणाले, अशी कुठलीही कॅप्सुल ठेवली जाणार नाही. तुम्ही ट्रस्टने जे अधिकृत निवेदन दिलं त्यावरच विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे ट्रस्टच्या सदस्यांमध्येच ताळमेळ नसल्याचं पुढे आलं आहे.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Ayodhya ram mandir

  पुढील बातम्या