प्रभू रामचंद्र हे मुस्लिमांचे देखील पूर्वज – बाबा रामदेव

योग गुरू बाबा रामदेव यांनी 'राम हे केवळ हिंदुचे नाहीत तर, मुस्लिमांचे देखील पूर्वज' असल्याचं विधान केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 9, 2019 02:05 PM IST

प्रभू रामचंद्र हे मुस्लिमांचे देखील पूर्वज – बाबा रामदेव

नडियार, 9 फेब्रुवारी : योग गुरू बाबा रामदेव यांनी 'राम हे केवळ हिंदुचे नाहीत तर, मुस्लिमांचे देखील पूर्वज' असल्याचं विधान केलं आहे. गुजरातमधील नडियार शहरामध्ये संतराम मंदिरामध्ये आयोजित योग शिबीरामध्ये सहभागी होण्यासाठी बाबा रामदेव आले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

'मक्का – मदिनेला राम मंदिर बांधणार का?'

राम मंदिर आणि राजकारण याचा काहीही संबंध नाही. राम मंदिर अयोध्येमध्ये नाहीतर मक्का – मदीना आणि व्हॅटीकन सिटीमध्ये बांधणार का? असा सवाल बाबा रामदेव यांनी यावेळी केला. तसेच 'राम हे केवळ हिंदुंचे नाहीत तर, मुस्लिमांचे देखील पूर्वज आहेत' असं विधान देखील बाबा रामदेव यांनी केलं आहे. दरम्यान, काँग्रेसकडून केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी राम मंदिराच्या मुद्द्याचं राजकारण केलं जात असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.


 

Loading...
हेही वाचा : रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; तिसऱ्यांदा ईडीकडून चौकशी


राम मंदिरावरून राजकारण

आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून सध्या अयोध्येतील राम मंदिराची चर्चा जोरात सुरू आहे. भाजपनं 2014 साली प्रचारादरम्यान राम मंदिराच्या उभारणीचं दिलेलं वचन भाजप विसरली का? असा सवाल हिंदुत्ववाद्यांकडून केला जात आहे. दरम्यान, मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं देखील अयोध्येमध्ये जात शक्तिप्रदर्शन केलं होतं. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'राम मंदिर केव्हा बांधणार ती तारीख सांगा?' असं थेट आव्हान भाजपला दिलं होतं. त्यानंतर विहिंपसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी भाजपला राम मंदिराच्या मुद्यावरून सवाल केले आहेत.

Special Report: अशीही बनवाबनवी, लग्नात थेट नवराच बदलला


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 02:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...