मराठी बातम्या /बातम्या /देश /Ayodhya News : रामललाच्या प्रतिष्ठापनेसाठी येणार PM मोदी, देश राममय करण्याची ट्रस्टची योजना

Ayodhya News : रामललाच्या प्रतिष्ठापनेसाठी येणार PM मोदी, देश राममय करण्याची ट्रस्टची योजना

राम मंदिरात रामलला प्रतिष्ठापनेसाठी पंतप्रधान मोदी येणार

राम मंदिरात रामलला प्रतिष्ठापनेसाठी पंतप्रधान मोदी येणार

PM Narendra Modi Invited Ayodha for Ram Mandir inaugration मंदिर ट्रस्टच्या बैठकीत रामलला मूर्तीच्या निर्मीतीवर चर्चा झाली. कर्नाटकातील दोन मूर्तीकारांची टीम पाच वर्षांच्या बालकरुपी रामाची मूर्ती तयार करत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अयोध्या, 02 जून : अयोध्येत राम मंदिर बांधकाम सध्या वेगाने सुरू आहे. मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण पाठवण्यात येणार आहे. ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी माहिती देताना म्हटलं की, अध्यक्ष याबाबत निवेदन पत्र पाठवणार आहेत. यावेळी अयोध्येत लाखोंची गर्दी जमा न करता पूर्ण देशात हा कार्यक्रम पोहोचवून देश राममय करायचा आहे असेही ट्रस्टचे सदस्य म्हणाले.

राम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत चर्चा झाली की, प्राणप्रतिष्ठापना करण्याच्या वेळी देशातील सर्व परिसरातील मंदिरांना सजवण्यात यावं आणि स्थानिक पातळीवर कार्यक्रम व्हर्च्युअल पाहण्याची व्यवस्था करावी. जानेवारी 2024 मध्ये प्राणप्रतिष्ठापनेच्या 7 ते 11 दिवस आधी याच्याशी संबंधित कार्यक्रम सुरू होतील. यावेळी वास्तुपुजेसह इतर अनेक धार्मिक कार्यक्रम असणार आहेत. यात मर्यादित लोक सहभागी होतील.

राम मंदिर ट्रस्ट आता मंदिराच्या गर्भगृहात रामललाच्या प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या माध्यमातून देश राममय करण्यासाठी योजना आखत आहे.

Shirdi Sai Baba : द्वारकामाई मंदिर दर्शन वेळेत बदल; शिर्डी साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय 

ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी रामललाची प्राणप्रतिष्ठापना करतील. यासाठी त्यांना ट्रस्टच्या अध्यक्षांच्यावतीने पत्र पाठवण्यात येत आहे. कार्यक्रमावेळी लाखोंची गर्दी होण्याची शक्यता नाकारता नाही. त्यामुळे देशभरात कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली जात आहे. अयोध्येतील राम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेबाबत बैठकीत गंभीर चर्चा झाली.

कामेश्वर चौपाल म्हणाले की, मूर्ती प्रतिष्ठापनेवेळी देशातील सर्व भागात असलेली मंदिरे सजवण्यात यावी. त्याठिकाणी प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम ऑनलाइन पाहण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी योजना आखण्यात येतेय. याठिकाणी लोक एकत्र येऊन रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम पाहू शकतील.

अयोध्योत लाखोंच्या लोकांच्या व्यवस्थेसाठी तयारी नाही. त्यात जानेवारीत प्रचंड थंडी असणार आहे. लाखोंच्या संख्येने लोक आल्यानंतर सुरक्षेसह त्यांच्या निवासाची व्यवस्था करणं कठीण असेल. देशभरात तेव्हा मंदिरांमध्ये उत्सवासारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असेल असंही कामेश्वर चौपाल म्हणाले.

कामेश्वर चौपाल यांनी सांगितलं की, मंदिर ट्रस्टच्या बैठकीत रामलला मूर्तीच्या निर्मीतीवर चर्चा झाली. कर्नाटकातील दोन मूर्तीकारांची टीम पाच वर्षांच्या बालकरुपी रामाची मूर्ती तयार करत आहेत. राजस्थानचे मूर्तीकार संगमरवरी दगडात मूर्ती साकारत आहेत. या सर्व मूर्ती ५१ इंची असतील.

First published:

Tags: Ayodhya