अयोध्येतील राम मंदिरासाठी साधु- संतांची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

अयोध्येतील राम मंदिरासाठी साधु- संतांची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

Ram Mandir in Ayodhya : साधु - संतांनी बैठक बोलावली असून देशातून 100 पेक्षा देखील जास्त संत या बैठकीला हजर राहणार आहेत.

  • Share this:

अयोध्या, 03 मे : राम मंदिर अयोध्येमध्ये व्हावं ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. 2014मध्ये देखील भाजपनं सत्तेत आल्यानंतर राम मंदिर बांधलं जाईल असं आश्वासन दिलं होतं. दरम्यान, 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सत्तेत आलं. त्यानंतर आता राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं जावं अशी मागणी साधु – संतांनी केली आहे. यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून अध्यक्षस्थानी रामजन्मभूमि न्यास अध्यक्ष महंत नृत्य गोपाळ दास असणार आहेत. या बैठकीमध्ये साधु- संत मोठा निर्णय घेतला जाईल अशी देखील चर्चा आहे. आज ( सोमवारी ) ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये देशातील 100 पेक्षा देखील जास्त संत सहभागी होणार आहेत. बैठकीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि RSS पदाधिकारी देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

VHPच्या उपाध्यक्षांचा सहभाग

VHPचे उपाध्यक्ष चंपत राय, केंद्रीय मंत्री राजेंद्र सिंह देखील या बैठकीला हजर असणार आहेत. 7 जून ते 15 जूनपर्यंत अयोध्येमध्ये राम मंदिराची बांधणी करण्याबाबत चर्चा होणार आहे. 2014मध्ये भाजपनं प्रचारात राम मंदिराचा मुद्दा पुढे केला होता. पण, पाच वर्षाच्या काळात मात्र राम मंदिरांची बांधणी झाली नव्हती. त्यामुळे आता तरी राम मंदिराची बांधणी करण्यात यावी अशी मागणी सध्या साधु – संत करत आहेत.

संवादातून तोडगा

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महेंत नरेंद्र गिरी यांनी परस्पर सहमतीनून मंदिराबाबत तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


VIDEO : 'उदयनराजे तुम्ही आमच्यासाठी वंदनीय, पण पुरंदरेंना आम्ही...', संभाजी ब्रिगेड आक्रमक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Ram Mandir
First Published: Jun 3, 2019 11:15 AM IST

ताज्या बातम्या