मराठी बातम्या /बातम्या /देश /AYODHYA : भूकंप असो वा वादळ, अयोध्येतील राम मंदिराला लागणार नाही धक्का; हे आहे कारण

AYODHYA : भूकंप असो वा वादळ, अयोध्येतील राम मंदिराला लागणार नाही धक्का; हे आहे कारण

अयोध्येतील राम मंदिराला लागणार नाही धक्का

अयोध्येतील राम मंदिराला लागणार नाही धक्का

अनेक शतके जुनी मंदिरे आणि इमारती आजही सुस्थितीत उभ्या असलेल्या दिसतात. राम मंदिर हे शतकानुशतके सुरक्षित राहणार असल्याचा दावा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अयोध्या, 2 नोव्हेंबर : अयोध्यानगरी जगभरातील हिंदूंसाठी श्रद्धेचा विषय आहे. येथे भव्यदिव्य राम मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. हे मंदिर सर्वोत्तम करण्यासाठी बारीकसारीक गोष्टींवर लक्ष दिलं जात आहे. वादळ किंवा भूकंप झाला तरी मंदिराच्या केसालाही इजा पोहोचू नये, याकडे अभियंते आणि तज्ज्ञ लक्ष देत आहेत. धर्मनगरी अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या उभारणीदरम्यान मंदिराच्या मजबुतीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. मंदिर हजारो वर्षे सुरक्षित ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाबरोबरच उच्च दर्जाच्या साहित्यावरही तज्ज्ञांचा भर आहे. मंदिराच्या उभारणीसाठी देशातील सर्वोत्तम साहित्याचा वापर केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

वाचा - PHOTOS: बांधकाम पूर्ण झाल्यावर असं दिसेल अयोद्धेतील राममंदिर, ट्रस्टने प्रसिद्ध केले नवीन फोटो

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मते, देशातील सर्वोच्च दर्जाचे दगड कर्नाटक आणि राजस्थानमधील बन्सी पहारपूर येथे मिळतात. येथील गुलाबी दगड मंदिरात बसवले जात आहेत. मंदिराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. याचा अर्थ भगवान रामाच्या गर्भ गृहाचे बांधकाम पूर्ण होईल. जानेवारी 2024 मध्ये देव मंदिरात विराजमान होतील.

श्री राम मंदिर भूकंप प्रतिरोधक कसे केले जात आहे?

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या कॅम्प ऑफिसचे प्रभारी प्रकाश गुप्ता म्हणतात की, हे मंदिर हजारो वर्षे सुरक्षित राहील कारण त्याचा पाया खूप मजबूत केला जात आहे. मंदिराचा पाया 60 फूट खालून घेतला आहे यावरून बांधकामाची ताकद किती आहे याचा अंदाज लावता येतो. त्यावर 60 फूट खोल काँक्रिटचे खडक उभारून बांधकाम केले जात आहे. सर्वात मोठ्या वादळाचाही मंदिरावर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा गुप्ता यांनी केला आहे. गुप्ता यांनी असेही सांगितले की ज्या दगडाने मंदिर बांधले जात आहे तो भारतातील सर्वोत्तम संगमरवरी आहे, जो कर्नाटकातून येथे येत आहे. याशिवाय राजस्थानमधील बन्सी पहारपूरच्या बलवा लाल दगडापासून खांब तयार केले जात आहेत.

First published:

Tags: Ayodhya, Ayodhya ram mandir