मराठी बातम्या /बातम्या /देश /

Ram Mandir Bhumi Pujan: राम सबके है, राम सब में है! वाचा PM नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Ram Mandir Bhumi Pujan: राम सबके है, राम सब में है! वाचा PM नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

5 ऑगस्ट रोजी झालेल्या राममंदिर भूमिपूजनामुळे देशभरात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी हसीना जहां यांनीही आपल्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन राममंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा दिल्या

5 ऑगस्ट रोजी झालेल्या राममंदिर भूमिपूजनामुळे देशभरात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी हसीना जहां यांनीही आपल्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन राममंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा दिल्या

Ayodhya Ram Mandir : आज संपूर्ण भारत राममय आहे. सारा देश रोमांचित आहे. मन दीपमय आहे. देश भावुक झाला आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा आज संपली, असे मोदी यावेळी म्हणाले.

  • Published by:  Priyanka Gawde
अयोध्या, 05 ऑगस्ट : रामनगरी अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते राममंदिर भूमिपूजन सोहळा (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) पार पडला. भूमिपूजन सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे मुख्य पुजारी श्री गद्दीनशीन प्रेमदास महाराज यांच्यासोबत हनुमानाचं दर्शन घेतलं तसेच, यांनी मोदींना चांदीचा 'मुकुट' परिधान केला. मोदींसह यावेळी पूजेला सरसंघचालक मोहन भागवतही बसले होते. पूजा संपन्न झाल्यानंतर मोदींनी जनतेशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मला या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हायला मिळालं. सर्वांचे आभार, या का ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार झालो हे माझं भाग्य आहे. - आज संपूर्ण भारत राममय आहे. सारा देश रोमांचित आहे. मन दीपमय आहे. देश भावुक झाला आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा आज संपली. कोट्यवधी लोकांचा कदाचित आजच्या दिवसावर विश्वास बसणार नाही की त्यांच्या हयातीत त्यांना आजचा हा दिवस दिसला. - आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी अनेकांनी आपण सगळं काही समर्पित केला. आंदोलन झालं नाही असा एकही दिवस नव्हता. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं नाही असा देशात एक भूभाग नसेल. - 15 ऑगस्टचा दिवस जसा त्या बलिदानांचं प्रतीक आहे. तसा राममंदिरासाठी वर्षानुवर्षं अनेक पिढ्यांनी अविरत एकनिष्ठपणे प्रयत्न केले. मी 120 कोटी देशवासीयांच्या वतीने मस्तक नमवून वंदन करतो. - राममंदिर आपल्या देशाच्या आधुनिक संस्कृतीचं प्रतीक बनेल. आपल्या राष्ट्रीय भावनेचं हे मंदिक प्रतीक असेल.कोट्यवधी लोकांच्या सामूहित संकल्पशक्तीचं हे प्रतीक असेल, तसेच, पुढच्या पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देत राहील. -या मंदिराबरोबर नवा इतिहास रचला जातोय. एवढंच नाही तर इतिहासाचा पुनरुच्चार होतो आहे. मावळे छत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेसाठी निमित्त झाले, त्याप्रमाणे इथेही आज देशभरातल्या लोकांच्या सहयोगाने राममंदिर निर्मितीचं हे पुण्यकर्म सुरू झालं आहे. - तसेच हे मंदिर उभं राहिल्यानंतर अयोध्येची भव्यता वाढेल. त्याबरोबर इथली सगळी अर्थव्यवस्थाही बदलेल. इथे नव्या संधी मिळतील. प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण होतील. संपूर्ण जगातून इथे लोक येतील. कितीतरी गोष्टी यातून बदलतील. - भारताच्या विविधतेत एकतेचं म्हणूनच अयोध्या हे प्रतीक आहे. भारताच्या आस्थेत राम आहे. भारताच्या दर्शनात राम आहे. पुरातन युगात वाल्मिकी रामायणातून रामाचं भव्य दर्शन झालं. -जगातली सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश इंडोनेशिया आहे. तिथे योगेश्वर रामायणासारखी अनेक रामायणं आहेत. राम आजही तिथे पूजनीय आहे. -कंबोडिया, लाओ, मलेशिया, थायलंड इथेही राम आणि रामायण आहे. इराण आणि चीनमध्येही रामकथांचं विवरण मिळेल. श्रीलंकेत रामाची कथा जानकीहरण म्हणून सांगितली जाते. नेपाळचा तर माता जानकीशी संबंध जोडला गेला आहे. अशा अनेक देशांमध्ये राम आजही आहे.
First published:

Tags: Ayodhya ram mandir, Narendra modi, Ram Mandir

पुढील बातम्या