शिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला!

शिवसेनेचा अयोध्येत होणार विहिंपशी सामना, 'संघा'ची सर्व शक्ती पणाला!

  • Share this:

अयोध्या, ता. 19 नोव्हेंबर : लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने राम मंदिराच्या मुद्यावरून वातावरण तापू लागलंय. येत्या रविवारी म्हणजे 25 नोव्हेंबरला संघ परिवार आणि शिवसेना अयोध्येत आमने-सामने येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जाहीर सभा घेताहेत तर त्याच दिवशी विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत धर्म धर्मसभेचं आयोजन केलं असून शिवसेनेपेक्षा ही सभा मोठी व्हावी यासाठी संघ परिवाराने आपली पूर्ण शक्ती पणाला लावलीय.


राम मंदिर बांधणं होत नसेल तर सांगा, आम्ही बांधतो असं थेट आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा जाहीर केला आणि भाजपला कोंडीत पकडलं. अयोध्येत शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. शिवसेना आणि भाजपचे संबंध सध्या ताणलेले असल्यानं शिवसेनेची ही कृती भाजपला आव्हान समजलं जातं.


याला उत्तर देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेनं त्याच दिवशी अयोध्येत धर्मसभेचं आयोजन केलंय. त्यासाठी जोरदार वातावरण निर्मिती उत्तरप्रदेशात सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप आणि अभाविप या संघपरिवारातल्या सर्व संघटना हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी झटत आहेत.


तर शिवसेनेचे मावळेही अयोध्येत दाखल झाले असून उत्तरेतलं पहिलच मोठं शक्तिप्रदर्शन यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र एक करताहेत. त्यामुळे येत्या रविवारी अयोध्या शिवसैनिक आणि विहिंपसमर्थक रामभक्त आमने सामने येणार आहे. परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवलीय.


 


वाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा


 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2018 04:34 PM IST

ताज्या बातम्या