राम मंदिरासाठी जमा झालेल्या सोन्या, चांदीच्या विटा सरकारी समितीला दिल्या जाणार?

राम मंदिरासाठी जमा झालेल्या सोन्या, चांदीच्या विटा सरकारी समितीला दिल्या जाणार?

न्यासाच्या खात्यात सुमारे 1.25 कोटींची रक्कम आहे. नव्याने स्थापन झालेल्या ट्रस्टला ही रक्कम दिली जाईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : राम मंदिरासाठी नव्याने स्थापन झालेल्या ट्रस्टला जवळपास सव्वा कोटी रुपये जे राम जन्म भूमीच्या न्यासाच्या खात्यात जमा आहेत ते दिले जातील, अशी घोषणा विश्वस्त शंकराचार्य वासुदेवानंद यांनी केली आहे. न्यासाच्या खात्यात सुमारे 1.25 कोटींची रक्कम आहे. नव्याने स्थापन झालेल्या ट्रस्टला ही रक्कम दिली जाईल.

नवी दिल्ली येथे ट्रस्टच्या नोंदणीकृत कार्यालयात येत्या 19 फेब्रुवारी रोजी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राची पहिली बैठक होणार आहे. या सभेला जाण्यापूर्वी शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती अयोध्येत ही माहिती दिली.

राम मंदिराची चळवळ सुरू झाल्यानंतर आतापर्यंत अनेकांनी सोन्याचा विटा, चांदीच्या विटा रामजन्मभूमी न्यासाला दिलेल्या आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्ट बाबत ही सर्व संपत्ती दिल्या जाते का हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नागपूरमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त रोहिंग्या, भाजपचा घणाघाती आरोप

श्रीराम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची भेट घेतली आणि बंद खोलीत गोपनीय चर्चा केली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या खात्यामध्ये मोठी रक्कम जमा होत होती. त्यामुळे आता यावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रस्तावित राम मंदिर मॉडेलच स्वीकारले जातील, कारण ते भारतीय कारागिरीचे वैशिष्ट्यपूर्ण नमुना आहे.

First published: February 18, 2020, 10:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading