मराठी बातम्या /बातम्या /देश /

Ram Mandir: अयोध्येत काय होणार? 3 दिवसांच्या भूमिपूजन कार्यक्रमाची Inside Story

Ram Mandir: अयोध्येत काय होणार? 3 दिवसांच्या भूमिपूजन कार्यक्रमाची Inside Story

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले – आम्हाला माहीत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पंतप्रधान मोदी राम मंदिर निर्माण करीत आहात. आम्हाला याबाबत काहीच तक्रार नाही. यावर खोपरखळी मारत ते पुढे म्हणाले असं वाटतंय की पीएम मोदी आणि कोरोना यांच्यामध्ये चर्चा झाली आहे, की 5 ऑगस्ट रोजी कोरोना अयोध्येला येणार नाही.

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले – आम्हाला माहीत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पंतप्रधान मोदी राम मंदिर निर्माण करीत आहात. आम्हाला याबाबत काहीच तक्रार नाही. यावर खोपरखळी मारत ते पुढे म्हणाले असं वाटतंय की पीएम मोदी आणि कोरोना यांच्यामध्ये चर्चा झाली आहे, की 5 ऑगस्ट रोजी कोरोना अयोध्येला येणार नाही.

गेल्या काही दशकांपासून मंदिरासाठी लागणाऱ्या खांबांचं काम कारसेवकपूरम इथं सुरु होतं. त्याचाच वापर आता केला जाणार आहे. या बांधकामात देशातल्या लोकांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar

अयोध्या 21 जुलै: राम मंदिराच्या (Ram Mandir)  भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची तारीख ठरल्यानंतर आता सगळ्या देशाचं लक्ष अयोध्येवर(Ayodhya) लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या हस्ते 5 ऑगस्टला हे भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम कसा असेल? काय होणार? कोण कोण येणार? याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. कोरोनामुळे कार्यक्रमावर बंधन येणार असली तरी तो कार्यक्रम साधाच पण ऐतिहासिक व्हावा यासाठी उत्तर प्रदेश सरकार कामाला लागले आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाची सुरुवात 3 ऑगस्टपासूनच होणार आहे. काशीतले विद्वान यासाठी पौरोहित्य करणार आहेत.

असा असेल कार्यक्रम

3 ऑगस्ट – गणेश पूजा

4 ऑगस्ट – रामार्चन

5 ऑगस्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन. 12.15 मिनिटांनी पंतप्रधान राम मंदिराच्या बांधकामाची पहिली वीट लावणार आहेत.

9 नोव्हेंबर 2019 ला सुप्रीम कोर्टाने अयोध्येचा निकाल दिल्यानंतर राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हापासून तयारीला सुरुवात झाली आहे. 25 मार्च रोजी गर्भगृहावर असलेल्या मूर्तींना तात्पुरत्या मंदिरात स्थापित करण्यात आलं होतं.

ऑक्सफर्डच्या कोरोना लशीमुळे आशा पल्लवित; आता भारतातही होणार ह्युमन ट्रायल

त्यानंतर मुळ गर्भगृहाची जागा समतल करण्यात आली होती. भूमिपूजनाचा कार्यक्रम निट नेटका व्हावा यासाठी उत्तर प्रदेश सरकार कामाला लागलं आहे. राम मंदिराच्या चळवळीत ज्या नेत्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांना या भूमिपूजन कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलं आहे.

देशातील मृतांचा आकडा 28 हजार पार, 24 तासांत नवीन रुग्णांची संख्या झाली कमी

161 फुटांचे हे मंदिर असणार आहे आणि त्याला पाच घुमट असतील. गेल्या काही दशकांपासून मंदिरासाठी लागणाऱ्या खांबांचं काम कारसेवकपूरम इथं सुरु होतं. त्याचाच वापर आता केला जाणार आहे. या बांधकामात देशातल्या लोकांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे.

कोरोनाची परिस्थिती थोडी निवळली की त्यासाठी देशभर व्यापक कार्यक्रम राबविण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

First published:

Tags: Narendra modi, Ram Mandir