'रुस्तम' आठवतोय? हाय प्रोफाइल लव्ह ट्रँगल मर्डर केसमुळे जेठमलानी झाले फेमस!

'रुस्तम' आठवतोय? हाय प्रोफाइल लव्ह ट्रँगल मर्डर केसमुळे जेठमलानी झाले फेमस!

राम जेठमलानी हे नाव देशाला माहिती झालं ती केस होती नानावटी विरुद्ध महाराष्ट्र सरकार. काय होती त्यात जेठमलानींची भूमिका? ज्यांनी 'रुस्तम' पाहिलाय त्यांना अंदाज येईल.

  • Share this:

मुंबई, 8 सप्टेंबर : ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी खासदार राम जेठमलानी यांचं वयाच्या 95 वर्षी निधन झालं. देशातील प्रख्यात वकील म्हणून त्यांची ओळख होती आणि वेगळ्या, जनमताच्या विरोधातल्या, नकारात्मक छटा असलेल्या केस त्यांनी लढवल्यामुळे त्यांचं नाव सतत गाजत असायचं. राम जेठमलानी हे नाव देशाला माहिती झालं ती केस होती नानावटी विरुद्ध महाराष्ट्र सरकार. अक्षय कुमार अभिनित 'रुस्तम' हा 3 वर्षांपूर्वी आलेला सिनेमा ज्यांना आठवतोय त्यांना या खटल्याची पार्श्वभूमी माहिती असेल. ती हाय प्रोफाईल लव्ह ट्रँगल मर्डर केस जेठमलानी यांनी हाताळली आणि त्यानंतर त्यांना देशभर ओळख मिळाली.

काय होती ती पहिली केस

राम जेठमलानी यांनी वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी कायद्याची डिग्री प्राप्त केली होती. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांना प्रॅक्टीस करण्याची परवानगी मिळाली होती. तरुणवयातच त्यांना 'नानावटी विरुद्ध महाराष्ट्र सरकार' या गाजलेल्या केसचा भाग होता आलं.

नेव्हीचे कमांडर असलेले कावस माणेकशॉ नानावटी यांनी त्यांच्या ब्रिटीश बायकोच्या प्रियकराचा त्याच्या बेडरूममध्ये घुसून खून केला, ते हे प्रकरण. KM Nanavati यांची पत्नी ब्रिटिश होती.

संबंधित - ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी कायदेमंत्री राम जेठमलानी यांचं निधन

तिचा प्रियकर प्रेम आहुजा याच्या खुनाची कबुली द्यायला स्वतः नानावटी पोलिसांकडे गेले होते. पण ही केस न्यायालयात अशी काही फिरली की, नानावटींना या केसमधून दोषमुक्त करण्यात आलं. नानावटींची प्रतिमा एक स्वच्छ नौदल अधिकारी अशी होती. देशाची सेवा करताना घरापासून दूर राहणाऱ्या या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बायको ही सॉफ्ट टारगेट हेरून प्रेम आहुजाने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि बायकोच्या चारित्र्याचं रक्षण करण्यासाठी कमांडर नानावटींना प्रेम आहुजाचा खून करावा लागला, असं हे प्रकरण न्यायालयात रंगवण्यात आलं.

हेही वाचा - तुम्हाला माहीत आहे का ISROच्या गगनयान मोहीमेबद्दल? नौदलाने केली तयारी!

नौदल अधिकारी नानावटींना या खटल्यात आरोपी असूनही सगळी सहानुभूती मिळाली. कोर्टात हा ऑफिसर कडक गणवेषात यायचा. त्यावेळी अनेक तरुणी त्याच्यावर फिदा असायच्या. नोटांवर लिपस्टिकच्या ओठांची खूण नोंदवून त्या नोटा कोर्टात येणाऱ्या नानावटींवर उधळल्या जायच्या, असा उल्लेख त्या वेळच्या बातमीत BBC ने केला होता. अखेर नानावटींची निर्दोष सुटका झाली.

प्रेम आहुजाची केस लढवणाऱ्या वकिलांच्या टीममधले एक होते राम जेठमलानी. आहुजाच्या बहिणीने ही टीम नेमली होती. कोर्टाच्या निकालाविरोधात या टीमने अपील केल्यानंतर पुन्हा निर्णय फिरला आणि नानावटी तुरुंगात गेले.

हे वाचा - हातात राष्ट्रध्वज घेऊन 2 वर्षाच्या चिमुकल्याने वडिलांच्या चितेला दिला मुखाग्नी..

त्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं. यथावकाश मुंबईच्या गव्हर्नरनी त्यांना माफी दिली आणि नानावटी सुटले. पुढे बायको आणि मुलांबरोबर कॅनडाला निघून गेले. तिथेच 2003मध्ये त्यांचं निधन झालं. पण या सगळ्या खटल्यात सिंधी विरुद्ध पारशी असा वाद कोर्टाबाहेर झाला होता. तेव्हा फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या सिंधींमधले एक होते राम जेठमलानी. त्यांना या खटल्यामुळे आवश्यक तो ब्रेक मिळाला आणि त्यांचं नाव देशभर पोहोचलं.

हेही वाचा - नवरा घरी असतानाही बोलवण्यासाठी आला प्रियकर, पतीने कात्री खुपसून केली हत्या!

पुढे एक निष्णात वकील म्हणून त्यांनी अशा अनेक केस हाताळल्या. शेअर घोटाळ्यातला आरोपी हर्षद मेहता, माजी पंतप्रधान राजीव गांधींचे मारेकरी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मारेकरी बेअंत सिंग यांच्या बाजूने जेठमलानी लढले. दहशतवादी अफझल गुरूचं वकीलपत्रही त्यांनी घेतलं होतं.

तरीही ते भाजपच्या वतीने राज्यसभेत पाठवले गेलेले खासदार होते आणि कायदेमंत्रीदेखील होते.

---------------------------------------------------------------

कोल्हापूर महामार्गावर दरड कोसळण्याचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 05:34 PM IST

ताज्या बातम्या