राम जन्मभूमी वादावर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी

राम जन्मभूमी वादावर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी

अयोध्येमधल्या रामजन्मभूमी वादावर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ही सुनावणी होणार असल्याने सगळ्यांचं या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 मे : अयोध्येमधल्या रामजन्मभूमी वादावर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. राम जन्मभूमीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तीन मध्यस्थांची नेमणूक करण्याचा आदेश दिला होता.

कोर्टाने नेमलेल्या या मध्यस्थांच्या समितीत जस्टीस खलीफुल्लाह, श्री श्री रविशंकर आणि वरिष्ठ वकील राम पांचू यांचा समावेश आहे. या समितीला अहवाल देण्यासाठी कोर्टाने दोन महिन्यांचा अवधी दिला होता.

गोपनीयतेचे आदेश

ज्या घटनापीठाने हा निर्णय दिला त्यात मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. ए. बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण, न्या. एस. अब्दुल नजीर यांचा समावेश होता. राम मंदिर प्रकरणी ही मध्यस्थी बंद खोलीत आणि पूर्णपणे गोपनीयता पाळून होईल, असंही कोर्टाने म्हटलं होतं.

मीडियावर बंदी

दर 14 दिवसांनी या समितीला कोर्टामध्ये प्रगती अहवाल सादर करावा लागणार असल्याचे आदेशही कोर्टाने दिले होते. महत्त्वाचं म्हणजे या समितीच्या कामकाजाची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास बंदी घालण्यात आली होती.

भावभावनांशी जोडलेला प्रश्न

राम जन्मभूमीचा हा प्रश्न लोकांच्या भावभावनांशी जोडलेला आहे. त्यामुळे हे सगळं लक्षात घेऊनच यावर तोडगा काढावा लागेल, असं कोर्टाने म्हटलं होतं. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ही सुनावणी होणार असल्याने सगळ्यांचं या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे.

============================================================================

भोपाळचा गड साध्वी प्रज्ञा राखणार? कसा सुरू आहे प्रचार थेट भोपाळमधून ग्राऊंड रिपोर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2019 07:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading