राम चबुतरा हे रामाचं जन्मस्थान, सुप्रीम कोर्टात मुस्लीम पक्षांनी केलं मान्य

राम चबुतरा हे रामाचं जन्मस्थान, सुप्रीम कोर्टात मुस्लीम पक्षांनी केलं मान्य

रामजन्मभूमी वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. यामध्ये, राम चबुतरा हे रामाचं जन्मस्थान आहे हे मुस्लीम पक्षाने मान्य केलंय. अयोध्येच्या वादाच्या सुनावणीचा आज 30 वा दिवस होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : रामजन्मभूमी वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. यामध्ये, राम चबुतरा हे रामाचं जन्मस्थान आहे हे मुस्लीम पक्षाने मान्य केलंय. अयोध्येच्या वादाच्या सुनावणीचा आज 30 वा दिवस होता.

सुप्रीम कोर्टात मुस्लीम पक्षाला विचारण्यात आलं, राम चबुतरा रामाचं जन्मस्थान आहे हे तुम्ही मानता का ?

त्यावर जफरयाब जिलानी म्हणाले, हो. आम्ही हे मानतो. पण भगवान रामाचा जन्म मध्य घुमटाखाली झाला होता हा हिंदू पक्षाचा दावा आम्हाला मान्य नाही.

या सुनावणीमध्ये जस्टीस बोबडे यांनी विचारलं, रामाचा जन्म अयोध्येत झाला होता यावर तुम्ही चर्चा करू इच्छित नाही का ?

त्यावर जिलानी म्हणाले, यावर चर्चा होऊ शकत नाही. जिथे मशीद होती तिथे रामाचा जन्म झाला याला मात्र आमचा विरोध आहे.

ट्रम्प यांची काश्मीरबद्दल पुन्हा मध्यस्थीची तयारी, आज मोदी-ट्रम्प यांची भेट

जस्टीस बोबडे - राम चबुतरा हे रामाचं जन्मस्थान आहे हे तुम्हाला मान्य आहे का ?

जिलानी - हो. कारण याआधी 3 कोर्टांनी हे सांगितलं आहे.

यावर जस्टीस भूषण म्हणाले, जन्मस्थानाबदद्ल कोणत्याही कोर्टाने हे सांगितलेलं नाही.

त्यावर जिलानी यांचं उत्तर होतं, 1886 च्या निर्णयामध्येही, राम चबुतरा हे रामाचं जन्मस्थान आहे असं म्हटलं आहे. पण नंतर मात्र हिंदू लोक इथे मंदिर असल्याचं म्हणू लागले. त्याचबरोबर घुमटाच्या जागेवरही त्यांनी दावा केला.

हिंदूंना राम चबुतऱ्यावरच मंदिर उभारायचं होतं पण जिल्हा कोर्टाने याची परवानगी दिली नाही, असंही जिलानी यांनी सांगितलं. भगवान रामाचा जन्म इथे झाला होता हे महत्त्वाचं आहे, असं जस्टीस बोबडे यांनी सांगितलं. अयोध्येच्या वादाप्रकरणी सुनावणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

=======================================================================================

VIDEO: 'हिंदुस्तान आणि पाकिस्तानचं विभाजन सोपं होतं पण युतीची वाटणी सोपी नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 06:19 PM IST

ताज्या बातम्या