नवी दिल्ली 17 जुलै: अयोध्येत राम मंदिराच्या (Ram mandir ayodhya) बांधकामाला आता वेग येणार आहे. येत्या 5 ऑगस्टला मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शनिवारी (18 ऑगस्ट) मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. ‘राम मंदिर निर्माण तीर्थ ट्रस्ट’ची (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) बैठक होणार असून त्यात हा निर्णय होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवलं जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संदर्भातला आढावा घ्यायलाही सुरुवात केली आहे.
श्रावण महिना हा पवित्र समजला जातो. याच महिन्यात भूमिपूजन व्हावं असा ट्रस्टचा प्रयत्न आहे. पंतप्रधानांच्या हस्तेच भूमिपूजन व्हावं अशी ट्रस्टच्या सगळ्यांचीच इच्छा आहे.
तर देशातल्या सर्व नागरिकांचा या बांधकामात सहभाग असावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी दिली. मंदिरासाठी पैसे कमी पडले नाहीत आणि पडणारही नाहीत असंही राय यांनी सांगितलं.
कोरोना आणि लॉडाऊनमुळे राम मंदिराच्या बांधामाच्या तयारीचा वेग थोडा मंदावला होता. आता त्याला वेग देण्याचा प्रयत्न होत आहे. ट्रस्ट आणि सरकारला पुढच्या दोन ते तीन वर्षांमध्ये हे बांधकाम पूर्ण करायचं आहे.