राम मंदिराचं लवकरच होणार भूमिपूजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार बांधकामाची सुरुवात

राम मंदिराचं लवकरच होणार भूमिपूजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार बांधकामाची सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूमिपूजनाचं निमंत्रण देण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास हे सोमवार किंवा मंगळवारी पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे.

  • Share this:

लखनऊ 28 जून: अयोध्येत राम मंदिराच्या (Ram mandir ayodhya) बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. सध्या त्याची पूर्व तयारी सुरू आहे. कोरोना संकटामुळे त्याला थोडा उशीर झाला होता. मात्र आता कामाने वेग घेतला असून मंदिराचं लवकरच भूमिपूजन होणार असल्याचे संकेत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांचे सहकारी महंत कमल नयन दास यांनी दिलीय. भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते व्हावं असा ट्रस्टचा प्रयत्न असून पंतप्रधानांना लवकरच निमंत्रण दिलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूमिपूजनाचं निमंत्रण देण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास हे सोमवार किंवा मंगळवारी पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. याबाबतचं वृत्त ‘आज-तक’ने दिलं आहे. श्रावण महिना हा पवित्र समजला जातो. याच महिन्यात भूमिपूजन व्हावं असा ट्रस्टचा प्रयत्न आहे. पंतप्रधानांच्या हस्तेच भूमिपूजन व्हावं अशी सगळ्यांचीच इच्छा असल्याचंही ते म्हणाले.

तर देशातल्या सर्व नागरिकांचा या बांधकामात सहभाग असावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी दिली. मंदिरासाठी पैसे कमी पडले नाहीत आणि पडणारही नाहीत असंही राय यांनी सांगितलं.

हे वाचा - Lockdown की Unlock-2? देशातल्या राज्यांमध्ये असे आहेत नियम, वाचा एका CLICKवर

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी अयोध्येला भेट देऊन नृत्यगोपाल दास यांची भेट घेतली. त्याचबरोबर कामाच्या तयारीचा आढावाही घेतला. पंतप्रधानांना निमंत्रण देण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.

संपादन - अजय कौटिवार

 

 

First published: June 28, 2020, 8:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading