अयोध्या प्रकरणाला वेगळं वळण, सुन्नी वक्फ बोर्ड घेणार खटल्यातून माघार

अयोध्या प्रकरणाला वेगळं वळण, सुन्नी वक्फ बोर्ड घेणार खटल्यातून माघार

राम जन्मभूमी प्रकरणात ज्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्यात सुन्‍नी सेंट्रल वक्‍फ बोर्ड हे सर्वात महत्त्वाचे प्रतिवादी आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 ऑक्टोंबर : गेल्या कित्येक दशकांपासून सुरू असलेल्या रामजन्मभूमी प्रकरणाला (Ram janam bhumi-babri masjid) वेगळं वळण मिळालं आहे. उत्‍तर प्रदेश सुन्‍नी सेंट्रल वक्‍फ बोर्डाने (UP Sunni Central Waqf Board) खटल्यातून माघार घेण्याची इच्छा व्यक्त केलीय. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court)  नेमलेल्या मध्यस्तांमार्फेत बोर्डानं कोर्टात शपथपत्र (Affidavit) दाखल केलंय. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेले पंच श्रीराम पंचू यांनी बोर्डाच्या वतीने हे शपथपत्र कोर्टात सादर केलंय. या प्रकरणात ज्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्यात सुन्‍नी सेंट्रल वक्‍फ बोर्ड हे सर्वात महत्त्वाचे प्रतिवादी  आहेत.

सुन्‍नी सेंट्रल वक्‍फ बोर्ड चे वकील जफरयाब जिलानी यांनी मात्र याबद्दल कानावर हात ठेवले आहेत. बोर्डानं असा निर्णय घेतला का याबद्दल आपल्याला काहीही माहित नाही असं स्पष्ट केलंय. रामजन्मभूमी प्रकरणात विविध आठ मुस्लिम पक्षकारांनी याचिका दाखल केल्या होत्या. यात सुन्‍नी सेंट्रल वक्‍फ बोर्डाच्या दोन याचिका आहेत.

हुश्श...! आज मान्सूनची महाराष्ट्रातून Exit होणार

या प्रकरणाते अन्य एक याचिकाकर्ते इक्बाल अंसारी यांचे वकील शमशाद यांच्या म्हणण्यानुसार प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यात सुनावणी असताना याचिका मागे घेणं शक्य आहे का याविषयी शंका वाटते असंही त्यांनी सांगितलं. जरी याचिका मागे घेतली तरीही आता युक्तिवाद संपलेला असून अन्य याचिकाकर्ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बाजूचे आहेत असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे बोर्डाने याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला तरी काहीही फरक पडणार नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

ICICI बँकेचा खातेदारांना Alert; ही काळीजी घ्या, नाहीतर अकाऊंट होईल खाली

आज सुनावणी संपणार

अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन (Ram Janm Bhoomi Babri Masjid) वादावरील सुनावणी आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर सर्वोच्च न्यायालय (supreme court)निर्णय सुरक्षित ठेवू शकतो. गेल्या 39 दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयातील घटनात्मक पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई (Chief Justice Ranjan Gogoi) यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या पीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी न्यायालयाने निश्चित केलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच सुनावणी पूर्ण होत आहे. यासाठी न्यायालयाने 17 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती.

PMC बँक घोटाळा: ह्रदयविकाराने दोन खातेदारांच्या मृत्यूनंतर डॉक्टरची आत्महत्या

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा आज 40 दिवस आहे. याआधी 39व्या दिवशी म्हणजे मंगळवारी हिंदू पक्षकारांचे वकील के.परासरन यांनी मशीदची निर्मिती ही एक ऐतिहासिक चूक असल्याचे म्हटले होते. मुस्लिम पक्षकारांनी केलेल्या युक्तीवादाला उत्तर देताना ते म्हणाले होते की, भारतात विजय मिळवल्यानंतर मुगल शासक बाबर(Mugal Emperor Babur)ने 433 वर्षांपूर्वी अयोध्येत प्रभू राम यांच्या जन्मस्थानावर मशीदीची निर्मिती करून ऐतिहासिक चूक केली होती. आता ही चूक सुधारण्याची गरज आहे.

राणेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

अयोध्येत मुस्लीम अन्य कोणत्याही मशीदीमध्ये प्रार्थना करू शकतात. एकट्या अयोध्येत 55 ते 60 मशीदी आहेत. पण हिंदूंसाठी प्रभू राम यांचे जन्मस्थान आहे. जे आम्ही बदलू शकत नाही. या घटनापीठात सरन्यायाधीश गोगोई यांच्यासह न्या.एस.ए.बोबडे, न्या.डी.वाय.चंद्रचूड, न्या.अशोक भूषण, न्या. एस.ए.नजीर यांचा समावेश आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 16, 2019, 11:52 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading