Ayodhya Case सुप्रीम कोर्टात 'हाय होल्टेज ड्रामा', मुस्लिम पक्षकारांच्या वकिलांनी फाडला नकाशा

Ayodhya Case सुप्रीम कोर्टात 'हाय होल्टेज ड्रामा', मुस्लिम पक्षकारांच्या वकिलांनी फाडला नकाशा

वकील राजीव धवन यांच्या या वर्तनाबद्दल सरन्यायाधीशांनी तीव्र नापसंती व्यक्त केलीय.

  • Share this:

नवी दिल्ली 16 ऑक्टोंबर : अयोध्य प्रकरणातल्या सुनावणीदरम्यान आज हाय होल्टेज ड्रामा घडला. प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच मुस्लिम संघटनांच्या पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी कोर्टात नकाशा फाडला हिंदू महासभेच्या वतीने परिसराच्या जमिनीचा नकाशा कोर्टात सादर करण्यात आला होता. वकील राजीव धवन यांच्या या वर्तनाबद्दल सरन्यायाधीशांनी तीव्र नापसंती व्यक्त केलीय. या प्रकरणावरच्या सुनावणीचा आज शेवटचा दिवस असून संध्याकाळी ही सुनावणी संपणार आहे. सर्वच पक्षकारांनी 5 वाजेपर्यंत आपला शेवटचा युक्तिवाद पूर्ण करावा अशी सूचना सरन्यायाधीश रंजन गोगोई  यांनी सर्व वकीलांना केली होती. सुप्रीम कोर्टाने जी मुदत घालून दिली होती त्या आधी एक दिवस सर्व सुनावणी संपणार असून कोर्ट आपला निर्णय 15 नोव्हेंबरपर्यंत देणार आहे.

अयोध्या प्रकरणाला वेगळं वळण, सुन्नी वक्फ बोर्ड घेणार खटल्यातून माघार

गेल्या कित्येक दशकांपासून सुरू असलेल्या रामजन्मभूमी प्रकरणाला (Ram janam bhumi-babri masjid) वेगळं वळण मिळालं आहे. उत्‍तर प्रदेश सुन्‍नी सेंट्रल वक्‍फ बोर्डाने (UP Sunni Central Waqf Board) खटल्यातून माघार घेण्याची इच्छा व्यक्त केलीय. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court)  नेमलेल्या मध्यस्तांमार्फेत बोर्डानं कोर्टात शपथपत्र (Affidavit) दाखल केलंय. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेले पंच श्रीराम पंचू यांनी बोर्डाच्या वतीने हे शपथपत्र कोर्टात सादर केलंय. या प्रकरणात ज्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्यात सुन्‍नी सेंट्रल वक्‍फ बोर्ड हे सर्वात महत्त्वाचे प्रतिवादी  आहेत.

सुन्‍नी सेंट्रल वक्‍फ बोर्ड चे वकील जफरयाब जिलानी यांनी मात्र याबद्दल कानावर हात ठेवले आहेत. बोर्डानं असा निर्णय घेतला का याबद्दल आपल्याला काहीही माहित नाही असं स्पष्ट केलंय. रामजन्मभूमी प्रकरणात विविध आठ मुस्लिम पक्षकारांनी याचिका दाखल केल्या होत्या. यात सुन्‍नी सेंट्रल वक्‍फ बोर्डाच्या दोन याचिका आहेत.

हुश्श...! आज मान्सूनची महाराष्ट्रातून Exit होणार

या प्रकरणाते अन्य एक याचिकाकर्ते इक्बाल अंसारी यांचे वकील शमशाद यांच्या म्हणण्यानुसार प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यात सुनावणी असताना याचिका मागे घेणं शक्य आहे का याविषयी शंका वाटते असंही त्यांनी सांगितलं. जरी याचिका मागे घेतली तरीही आता युक्तिवाद संपलेला असून अन्य याचिकाकर्ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बाजूचे आहेत असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे बोर्डाने याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला तरी काहीही फरक पडणार नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

First published: October 16, 2019, 1:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading