ओखी वादळाचा गुजरात प्रचाराला फटका; अमित शहांच्या तीन सभा रद्द

ओखी वादळाचा गुजरात प्रचाराला फटका; अमित शहांच्या तीन सभा रद्द

राजुला, महुवा आणि शिहोर इथे अमित शहांच्या सभा होणार होत्या. या सभा रद्द करण्यात आल्या आहेत. राजुला अमरेली जिल्ह्यात आहे, महुवा भावनगर जिल्हयात आहे तर शिहोरही भावनगर जिल्ह्यात आहे.

  • Share this:

05 डिसेंबर: ओखी वादळाचा गुजरातच्या प्रचाराला फटका बसला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या आजच्या तीन सभा रद्द करण्यात आल्या आहेत.

राजुला, महुवा आणि शिहोर इथे अमित शहांच्या सभा होणार होत्या. या  सभा रद्द करण्यात आल्या आहेत. राजुला अमरेली जिल्ह्यात आहे, महुवा भावनगर जिल्हयात आहे तर शिहोरही भावनगर जिल्ह्यात आहे.केरळमध्ये धुमाकूळ घालणारं ओखी वादळ आता  महाराष्ट्र आणि्  गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. यामुळे मुंबई  आणि कोकण किनारपट्टीला धोका उरलेला नाही. कारणं हे वादळ गुजरातकडे सरकलं आहे. या वादळामुळे मुंबईत पाऊस होतो आहे. ऐन गुजरातच्या निवडणुकांच्या तोंडावर हे वादळ आता गुजरातच्या सीमेवर धडकलं आहे. गुजरातमध्ये 8 डिसेंबरला मतदान होणार आहे. या वादळाचा फटका मतदानालाही बसू शकतो.

त्यामुळे आता याचा परिणाम गुजरातच्या निवडणुकांवर होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2017 10:53 AM IST

ताज्या बातम्या