रिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर

रिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर

रिलायन्स इंडस्ट्रीजला गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या टप्प्यात 10 हजार 362 कोटी रुपयांचा घसघशीत नफा झाला आहे. रिलायन्स जिओ ने गेल्या अडीच वर्षात 30 कोटी ग्राहकांचा आकडा पार केला आहे.

  • Share this:

मुंबई, 18 एप्रिल : रिलायन्स इंडस्ट्रीजला गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या टप्प्यात 10 हजार 362 कोटी रुपयांचा घसघशीत नफा झाला आहे. रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रातही रिलायन्स कंपनीला चांगला फायदा झाला.

त्याचसोबत 'जिओ' ला सुद्धा जानेवारी ते मार्च मध्ये 840 कोटींचा नफा झाला आहे. रिलायन्स जिओ ने गेल्या अडीच वर्षात 30 कोटी ग्राहकांचा आकडा पार केला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या या घवघवीत यशाबद्दल रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 2019 च्या आर्थिक वर्षात रिलायन्स कंपनीने मोठं यश मिळवलं आहे. कंपनीची भविष्यात आणखी प्रगती व्हावी यासाठी चांगले प्रयत्न झाले आहेत, असं ते म्हणाले.

रिलायन्स रिटेलने एक लाख कोटींचा आकडा पार केला.जिओ चे 30 कोटींपेक्षा जास्त ग्राहक झाले. पेट्रोकेमिकलच्या क्षेत्रातही आम्ही सर्वाधिक कमाई केली आहे, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं.

आर्थिक वर्षात चांगली प्रगती झाल्यामुळे प्रति शेअर 6.5 रुपये डिव्हिडंड देण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीज ने केली आहे.

2019 च्या चौथ्या तिमाहीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचं उत्पन्न 1.20 लाख कोटी रुपयांवरून 1.38 लाख कोटी रुपयांवर गेलं आहे.

==================================================================================================================================================================

डिसक्लेमर : न्यूज 18 लोकमत डॉट कॉम हे रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी नेटवर्क 18 चा एक भाग आहे. नेटवर्क 18 मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आहे.

First published: April 18, 2019, 8:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading