मुंबई, 15 ऑगस्ट : रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनी यांनी एक गोड पोस्ट ट्वीट केली आहे. 15 ऑगस्टला संध्याकाळी त्यांनी आपला मोठा भाऊ आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ट्विटरवर टॅग करत एक जुना फोटा शेअर केला. प्रियांका आणि राहुल यांचा लहानपणचा हा फोटो अनेकानी रीट्वीट केला आणि शेअर केला आहे. या फोटोतून राजकारणातल्या या मोठ्या घराण्यातले भावा-बहिणींचं जिव्हाळ्याचं नातं समोर येतं.
प्रियांका गांधी यांनी हा फोटो शेअर करताना एक भावुक पोस्टही लिहिली आहे. अजूनही आपल्यात काही बदल झाला नाहीये... हो ना? असं करत प्रियांका यांनी एक इमोटिकॉनही शेअर केला आहे. राहुल गांधींना टॅग करत बेस्ट ब्रदर इन द वर्ल्ड असं