मुंबई, 5 ऑगस्ट : लखनऊमधील (Lucknow) टॅक्सी चालकाला (Cab drirver) रस्त्यात मारहाण (Beaten) करणाऱ्या तरुणीचं प्रकरण आता बॉलिवूडपर्यंत (bollywood) पोहोचलं आहे. अभिनेत्री राखी सावंतनं (Rakhi Sawant) या तरुणीवर टीका केली असून हिंमत असेल, तर आपल्याशी पंगा घेऊन दाखव, असं आव्हान (Challenge) या तरुणीला दिलं आहे. नव्याने कराटे शिकल्याची मस्ती आपण उतरवायला तयार आहोत, असं आव्हानही राखी सावंतनं या महिलेला दिलं आहे.
काय म्हणाली राखी सावंत
कॅब चालक हे नागरिकांची सेवा करत असतात. त्यांचा काहीही दोष नसताना त्यांना मारहाण करणं चुकीच असल्याचं राखी सावंतनं म्हटलंय. तुम्ही केवळ महिला आहात, म्हणून कुणालाही मारण्याचा आणि कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, असं तिनं सांगितलं. या मुलीत हिंमत असेल, तर तिनं आपला भाऊ खलीशी पंगा घेऊन दाखवावा, असं आव्हानही राखी सावंतनं दिलं आहे. या मुलीला नव्याने कराटे शिकल्यामुळे आपण सर्वोत्तम असल्याचं वाटत असेल, तर तिने आपल्याशी पंगा घेऊन दाखवावा, असंही राखी सावतं म्हणाली आहे.
हे वाचा -VIDEO: नवी मुंबईत लुटमार, बंदुकीचा धाक दाखवत सोन्याने भरलेली बॅग केली लंपास
पोलिसांवर कारवाई
दरम्यान, या प्रकरणात कॅब ड्रायव्हरने पोलिसांवर केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेत पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डी. के. ठाकूर यांनी पोलीस निरीक्षक आणि दोन हवालदारांना निलंबित केलं आहे. पोलीस आणि महिलेमध्ये साटंलोटं असल्यामुळेच महिलेला सोडून देण्यात आल्याचा आरोप कॅब चालकानं केला होता. त्याचप्रमाणं आपली पोलीस स्थानकातून सुटका करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोपही कॅब चालकानं केला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी घरी परत चाललेल्या कॅब ड्रायव्हरला ट्रॅफिक सिग्नलवर या महिलेनं मारहाण केली होती. पैसे लुटण्यासाठी तिनं हा स्टंट केल्याचा आरोप कॅब चालकानं केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rakhi sawant, Uttar pardesh