पाहा VIDEO : राज्यसभेत हमसून हमसून रडू लागले खासदार

पाहा VIDEO : राज्यसभेत हमसून हमसून रडू लागले खासदार

राज्यसभेमध्ये काही खासदारांचा बुधवारी शेवटचा दिवस होता.आपल्या निरोपाच्या भाषणामध्ये एक खासदार खूपच भावूक झाले आणि संसदेतच हुंदके देत रडू लागले. भाषण करत असताना त्यांनी खूप वेळा अश्रू आवरण्याचा प्रयत्न केला पण ते स्वत:ला सावरू शकले नाहीत.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जुलै : राज्यसभेमध्ये काही खासदारांचा बुधवारी शेवटचा दिवस होता.आपल्या निरोपाच्या भाषणामध्ये एक खासदार खूपच भावूक झाले आणि संसदेतच हुंदके देत रडू लागले. भाषण करत असताना त्यांनी खूप वेळा अश्रू आवरण्याचा प्रयत्न केला पण ते स्वत:ला सावरू शकले नाहीत.

अण्णाद्रमुकचे खासदर वासुदेवन मैत्रेयन यांच्याबाबतीत राज्यसभेत हा प्रसंग घडला. या खासदारांचा संसदेत 14 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यावेळी निरोपाचं भाषण करताना त्यांना रडू आवरलं नाही. एवढंच नव्हे तर आपलं निधन झाल्यावर सभागृहामध्ये शोक प्रस्ताव मांडू नका, असंही त्यांनी सहकारी सदस्यांना सांगितलं.

2009 मध्ये श्रीलंकेत तामिळ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यसभेमध्ये शोकप्रस्ताव ठेवण्यात आला नव्हता. यामुळे मी दु:खी झालो आहे. म्हणूनच माझ्या मृत्यूनंतरही शोक प्रस्ताव आणू नका, असं ते म्हणाले.

मॉब लिंचिंग आणि 'जय श्रीराम' याबदद्ल 49 सेलिब्रेटींचं मोदींना पत्र

संसदेतल्या कारकिर्दीबद्दल त्यांनी आपले खास मित्र अरुण जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. वासुदेवन मैत्रेयन यांनी त्यांच्या पक्षाच्या दिवंगत नेत्या जयललिता यांचीही आठवण काढली. वासुदेवन मैत्रेयन यांच्यासोबतच डी. राजा, के. आर. अर्जुन, आर. लक्ष्मण, टी. रत्नवेल या खासदारांचीही राज्यसभेतली कारकीर्द संपली.

==================================================================================

VIDEO: धक्कादायक! डोंगराला पडल्या भेगा, 143 कुटुंबांचं काय होणार?

First Published: Jul 24, 2019 04:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading