मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या प्रियंका गांधींना राज्यवर्धन राठोड यांनी केली 'ही' विनंती

पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या प्रियंका गांधींना राज्यवर्धन राठोड यांनी केली 'ही' विनंती

Rajyavardhan Singh Rathore on Priyanka Gandhi: भाजपचे नेते राज्यवर्धन सिंह राठोड यांनी प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Rajyavardhan Singh Rathore on Priyanka Gandhi: भाजपचे नेते राज्यवर्धन सिंह राठोड यांनी प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Rajyavardhan Singh Rathore on Priyanka Gandhi: भाजपचे नेते राज्यवर्धन सिंह राठोड यांनी प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • Published by:  Sunil Desale

नवी दिल्ली, 21 एप्रिल: भारतात कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग मोठ्या वेगाने पसरत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना विरुद्धच्या सुरू असलेल्या लढाईवरुन केंद्र सरकारच्या रणनीतीवरुन काँग्रेस (Congress)कडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी या मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर आता भाजप नेते राज्यवर्धन सिंग राठोड (Rajya Vardhan Singh Rathore) यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींवर निशाणा साधत चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

राहुल आणि प्रियंका गांधींना विनंती

राज्यवर्धन राठोड यांनी म्हटलं, "राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना विनंती करतो की, त्यांनी अशा प्रकारची टिप्पणी करू नये. तुम्ही खासगी कंपन्यांना दोष देत आहेत ज्या कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी आहेत. देशाचा प्रत्येक नागरिक या लढाईत सहभागी आहे केवळ राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि त्यांचे कुटुंब हे कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी नाहीये."

राज्यवर्धन राठोड यांनी पुढे म्हटलं, आता राज्यस्थानमध्ये बेड्स, औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दारूची विक्री खुलेआम होत आहे पण बाजारपेठा बंद आहेत. ही कोरोना विरुद्ध लढाईसाठी राज्य सरकारची तयारी आहे का?

वाचा: Corona स्थितीवरुन प्रियंका गांधींचा मोदींवर वार, देवेंद्र फडणवीसांनी केला पलटवार

राहुल गांधींनी आरोप केला होता की, केंद्र सरकारकडून सुरू असलेली लसीकरण मोहीम ही नोटबंधीपेक्षा कमी नाहीये कारण या लसीकरणासाठी नागरिकांना रांगेत उभे रहावे लागत आहे, त्यांचे पैशांचे नुकसान होत आहे आरोग्य धोक्यात आहे.

प्रियंका गांधींनी मोदींवर केली होती टीका

देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यांनी म्हटलं होतं की, कोरोनामुळे लोक मृत्यूमुखी पडत आहेत आणि ते मोठ मोठ्या सभांमध्ये जाऊन हसत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी सरकार केवळ आपली प्रतिमा चमकवण्याच्या मागे लागलेलं आहे.

First published:

Tags: BJP, Coronavirus, Priyanka gandhi