मराठी बातम्या /बातम्या /देश /

राज्यसभेत पोहोचताच उदयनराजेंची शरद पवारांवर टीका, म्हणाले...

राज्यसभेत पोहोचताच उदयनराजेंची शरद पवारांवर टीका, म्हणाले...

किती दिवस सांगणार लोकांना घरात बसून राहा, उद्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल' अशी भीतीही उदयनराजेंनी बोलून दाखवली.

किती दिवस सांगणार लोकांना घरात बसून राहा, उद्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल' अशी भीतीही उदयनराजेंनी बोलून दाखवली.

किती दिवस सांगणार लोकांना घरात बसून राहा, उद्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल' अशी भीतीही उदयनराजेंनी बोलून दाखवली.

  • Published by:  sachin Salve
नवी दिल्ली, 22 जुलै : साताऱ्याचे भाजपचे नेते उदयनराजे भोसले आता पुन्हा एकदा खासदार होणार आहे. आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेण्यासाठी उदयनराजे दिल्लीत पोहोचले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली. उदयनराजे भोसले यांनी न्यूज 18 लोकमतशी खास बातचीत केली.  'भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशात सर्व जातींमध्ये सलोखा राहिला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या विचाराचे स्वतंत्र आहे', असं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या  राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत विधानावर प्रतिक्रिया दिली. योगायोग! महाराष्ट्रात भूकंप घडणारे अजितदादा आणि फडणवीसांचा आज हॅप्पी बड्डे 'कोरोनाचा कठीण काळ आहे.पण घरी थांबून चालणार नाही. आतापर्यंत लोकांना केंद्रबिंदू म्हणूनच आजवर काम करत आलो. जेव्हा पद नव्हतं तेव्हा समाजकारण केलं, राजकारण कधीच केले नाही. गेल्या तीस वर्षात जेवढी समाजाची सेवा करता येईल तेवढी केली. राज्यसभेच्या संधीचा पुरेपूर लोकहितासाठी वापर करेन. केवळ सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करत राहीन' अशी ग्वाही उदयनराजेंनी दिली. 'कोरोनावर लवकरात लवकर लस निघाली पाहिजे. लॉकडाउनमुळे लोकांचे रोजगार हिरावले आहेत. किती दिवस सांगणार लोकांना घरात बसून राहा, उद्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल' अशी भीतीही राजेंनी बोलून दाखवली. ठेच लागली अन् नशीब चमकलं! मजुराला मिळाला 10.68 कॅरेट हिरा दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यामुळे पवारांना मोठा धक्का मानला जात होता. त्यानंतर उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन साताऱ्यातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली होती. पण, शरद पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपले खास विश्वासू  श्रीनिवास पाटील यांनी मैदानात उतरवले. अखेर या पोटनिवडणुकीत साताऱ्याच्या जनतेनं शरद पवारांची साथ देत राजेंना पराभवाची धूळ चारली होती. उदयनराजे यांनाही याची आधीच कुणकुण लागली होती. त्यामुळे त्यांनी राज्यसभेच्या जागेसाठी भाजपकडे आधीच अट घालून ठेवली होती. अखेर आज उदयनराजे पुन्हा एकदा राज्यसभेचे खासदार म्हणून मैदानात परत उतरले आहे.
First published:

Tags: उदयनराजे भोसले, राम मंदिर, शरद पवार

पुढील बातम्या