जाणून घ्या; तिहेरी तलाक दिल्यास होईल इतकी शिक्षा आणि दंड!

जाणून घ्या; तिहेरी तलाक दिल्यास होईल इतकी शिक्षा आणि दंड!

तिहेरी तलाक विधेयकात नेमक्या कोणत्या तरतूदी आहेत जाणून घ्या...

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जुलै: अखेर तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत देखील मंजूर झाले. राज्यसभेने मंगळवारी हे विधेयक 99 विरुद्ध 84 मतांनी मंजूर केले. आता विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले जाईल. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा लागू होईल. या विधेयकात नेमक्या कोणत्या तरतूदी आहेत जाणून घ्या...

तिहेरी तलाक विधेयकाचे पूर्ण नाव मुस्लिम महिला (महिला अधिकार संरक्षण कायदा) विधेयक, 2019 असे आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर तोंडी, लेखी आणि अन्य कोणत्याही माध्यमातून 3 वेळा तलाक देण्यावर बंदी असेल. अशा पद्धतीने तलाक दिल्यास तो गुन्हा ठरेल. अशा पद्धतीने पत्नीला तलाक दिल्यास तो गुन्हा असेल आणि त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येऊ शकेल.

इतिहास घडला, तिहेरी तलाक यापुढे गुन्हा; ऐतिहासिक विधेयकाला राज्यसभेची मंजुरी!

तुरुंगवास आणि होणार दंड

जर एखाद्या व्यक्तीने पत्नीला तिहेरी तलाक दिल्यास त्याला 3 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकते. त्याच बरोबर त्याला दंड देखील होऊ शकतो. अशा पद्धतीने पतीवर गुन्हा दाखल केल्यास जामीन मिळवण्यासाठी त्याला न्यायालयात जावे लागेल.

पत्नीला मिळणार नुकसान भरपाई

जर एखाद्या महिलेला तिहेरी तलाक दिला तर ती महिला पतीकडून नुकसान भरपाई मागू शकते. अर्थात पत्नीला किती नुकसान भरपाई द्यावी हे निश्चित करण्यात आलेले नाही. पीडित महिलेला किती नुकसान भरपाई द्यावी हे न्यायालयातील सुनावणीनंतर निश्चित केले जाईल.

मुलाचा ताबा कोणाला मिळणार?

तिहेरी तलाक विधेयकानुसार पीडित महिला अल्पवयीन मुलाचा ताबा स्वत:कडे मागू शकते. मुलाचा ताबा कोणाकडे द्यावा याचा निर्णय न्यायालयातील सुनावणीनंतर केला जाईल.

'ती' राष्ट्रवादीची ऐतिहासिक चूक, जितेंद्र आव्हाडांची कबुली पाहा हा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: July 30, 2019, 9:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading